गोवा खबर

देशभरात सामूहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रम

Published

on

Spread the love
  • गोव्यात १४ ठिकाणी १६२ हून अधिक हिंदूंनी घेतला या उपक्रमाचा लाभ

गोवा खबर : हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातन संस्थेच्या वतीने २९ मार्च या दिवशी देशभरात सामूहिक हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्ताने ठिकठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरे, श्रीराम मंदिरे यासह अन्य शेकडो ठिकाणी २० हजारांहून भाविक, साधक, हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले.

यात समविचारी संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ते, उद्योजक, विचारवंत आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीही सहभागी झाली होती. तसेच विविध या पठणाच्या कार्यक्रमात उत्साहपूर्ण सहभागी झाले होते. गोव्यात १४ ठिकाणी १६२ हून अधिक हिंदूंनी उपक्रमाचा लाभ घेतला. या उपक्रमात ‘गोवा हिंदू युवा शक्ती’ या संघटनेनेही सहभाग घेतला.

२९ मार्च या दिवशी शनिगोचर अर्थात् शनिदेवानी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे. या शनिगोचरचा भाविकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी देशभरात सामूहिक हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला.  हनुमान चालिसा पठणाच्या वेळी हनुमंत आणि  शनिदेव यांच्या चरणी हिंदू राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना होण्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

Trending

Exit mobile version