गोवा खबर

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निमंत्रण

Published

on

Spread the love

गोवा खबर : ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण नुकतेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना देण्यात आले. सावंत यांनी महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी अधिवक्ता सर्वश्री राजेश गावकर, सनातन संस्थेचे तुळशीदास गांजेकर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आणि नारायण नाडकर्णी यांची उपस्थिती होती.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव सोहळा आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष यानिमित्ताने फर्मागुडी येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. हा महोत्सव १७ ते १९ मे २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.

या महोत्सवासाठी देशभरातून अनेक संत-महंत, मुख्यमंत्री, केंद्र आणि राज्य सरकारांतील मंत्री, प्रखर हिंदुत्वनिष्ठ, विचारवंत, अधिवक्ता, उद्योजक, संपादक आदी मान्यवरांसह २० हजारांहून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदू उपस्थित राहणार आहेत.

Trending

Exit mobile version