गोवा खबर

दक्षिण कोरियेतील यशस्वी रोड शोसह गोवा पर्यटनाने मारली जागतिक छाप

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने २८-२९ मार्च रोजी दक्षिण कोरियेतील सेऊल आणि बुसान येथे रोड शोचे यशस्वी आयोजन केले. गोव्याला कोरियन पर्यटकांसाठी प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून स्थान देणे आणि दोन्ही देशांमधील पर्यटन संबंध अधिक मजबूत करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

या भेटी दरम्यान, गोवा सरकारचे पर्यटन संचालक  केदार नाईक यांच्या नेतृत्वाखालील गोव्याच्या शिष्टमंडळाने कोरिया प्रजासत्ताकातील भारताचे राजदूत श्री अमित कुमार यांची भेट घेतली. त्यांनी गोव्याच्या सुधारित पायाभूत सुविधांचे कौतुक केले, ज्या विविध आकर्षणांसाठी सुधारित प्रवेशयोग्यता प्रदान करतात. या रोडशोमध्ये गोव्यातील प्रसिद्ध सांस्कृतिक वारसा स्थळे, जलक्रीडा आणि आरोग्य विषयक अनुभव, योग आणि आयुर्वेदाच्या अनुभवांसह, आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आकर्षित करणारे महत्त्वाचे ठिकाण म्हणून गोव्याला ठळकपणे सादर करण्यात आले.

नाईक यांनी नमूद केले की, गोव्याने विशेषत: रशिया आणि ब्रिटनमधून आंतरराष्ट्रीय पर्यटकांना मोठ्या संख्येने आकर्षित केले आहे. देशांतर्गत प्रवाशांनीही पावसाळ्यात गोव्याला भेट देण्यास आवड दर्शवली आहे. अभ्यागतांना चांगला अनुभव देण्यासाठी थेट आंतरराष्ट्रीय उड्डाण जोडणीचा विस्तार आणि डिजिटल वाहतूक मार्गदर्शन ॲप, विकसित करण्याच्या योजनांसह त्यांनी महत्त्वाच्या उपक्रमांवर प्रकाश टाकला.

गोव्यातील सेवांचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यासाठी, पर्यटन खाते लवकरच सोशल मीडिया चॅनेलद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्यास भारतीय मिशनसोबत आपले नवनवीन प्रचारात्मक व्हिडिओ शेअर करणार आहे. कोरियन प्रवासी आणि चित्रपट निर्मात्यांना येथे गुंतवून ठेवण्यासाठी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) निमंत्रण देखील त्यांना दिले जाईल.

प्रथम सचिव आणि चान्सरी प्रमुख, भारतीय दूतावास, सेऊल, रिपब्लिक ऑफ कोरिया सौ. अनन्या अग्रवाल यांनी सेऊल इंटरनॅशनल ट्रॅव्हल फेअर (एसआयटीएफ) हे कोरियन प्रेक्षकांना गोव्याची पर्यटन क्षमता दाखवण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ असल्याचे सांगितले.

सध्या, गोवा आणि दक्षिण कोरियाला जोडणारे आठ उड्डाण मार्ग आहेत, जे एअर इंडिया, कोरियन एअर आणि एशियाना एअरलाइन्स सारख्या विमान कंपन्यांद्वारे चालवले जातात. प्रवासाचे ठिकाण म्हणून गोव्याची वाढती आवड पूर्ण करण्यासाठी, जोडणीचा आणखी विस्तार करण्याच्या दृष्टीने योजना सुरू आहेत.

पर्यटन खाते गोव्याची समृद्ध संस्कृती, वारसा आणि साहसी संधींचे प्रदर्शन करण्यासाठी सक्रिय प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर जगभरातील पर्यटकांना राज्याचे अनोखे आकर्षण शोधण्यासाठी आमंत्रित करत आहे.

Trending

Exit mobile version