गोवा खबर

गोवा कला महाविद्यालयात वार्षिक प्रदर्शनाचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगूण वेळीप यांच्या हस्ते गोवा कला महाविद्यालयाच्या वार्षिक प्रदर्शन आणि वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन झाले.

डॉ. पांडुरंग फळदेसाई या कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. विल्फ्रेड गोंयस यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध कलाकार फ्रान्सिस न्यूटन सौझा आणि डॉ. मनोहर राय सरदेसाई याना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सुनील सरदेसाई आणि उमेश सरदेसाई कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. सगूण वेळीप आणि डॉ. पांडुरंग फळदेसाई यानी विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या कलाकृतींचे कौतुक केले.

Trending

Exit mobile version