गोवा खबर

बारावीचा निकाल जाहीर : यंदाही मुलींचे वर्चस्व!

Published

on

Spread the love
  • गोवा शालान्त मंडळाच्या अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांची माहिती

गोवा खबर : गोवा शालान्त आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदाचा निकाल ९०.६४ टक्के इतका लागला आहे. यावर्षीही मुलींनीच बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

शाखानिहाय निकाल:

  • कला: ९१.०३%
  • वाणिज्य: ९३.३१%
  • विज्ञान: ९१.३२%
  • व्यावसायिक: ८२.७१%

मंडळाचे चेअरमन भगिरथ शेट्ये यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. परीक्षेस १७,६८६ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १६,०३० जणांनी यश मिळवले आहे.

मुली पुन्हा आघाडीवर!

मुलींचा उत्तीर्ण दर ९२.४२% असून मुलांचा निकाल ८८.७९% लागला आहे. यावरून मुलींनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.

तालुकानिहाय निकाल:

  • बार्देश: ९४.९८%
  • तिसवाडी: ९४.१४%
  • डिचोली: ८९.६८%
  • पेडणे: ९१.२४%
  • सत्तरी: ८१.२२%
  • काणकोण: ८८.३९%
  • धारबंदोडा: ८२.१४%
  • केपे: ८७.८३%
  • मुरगाव: ९०.३६%
  • फोंडा: ८५.१८%
  • सासष्टी: ९१.६६%
  • सांगे: २५.९२%

गुणानुसार विद्यार्थ्यांची संख्या:

  • ३३ ते ४५ गुण: १२०२ विद्यार्थी
  • ४६ ते ५९ गुण: ६०२९ विद्यार्थी
  • ६० ते ८० गुण: ७७२५ विद्यार्थी
  • ८१ ते १०० गुण: १७९१ विद्यार्थी

पत्रकार परिषदेस मंडळाचे सचिव विद्यादत्त नाईक आणि आयटी विभागाचे उपसचिव भारत चोपडे उपस्थित होते. राज्यातील बारावीचा निकाल यंदाही समाधानकारक लागला असून मुलींचा उत्तम प्रदर्शन विशेष ठरले आहे.

Trending

Exit mobile version