गोवा खबर

डायलिसिसच्या रुग्णांसाठी ‘जॉय राईड’चे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : मणिपाल हॉस्पिटल गोवा, रिव्हर नेव्हिगेशन विभाग, मोहन फाऊन्डेशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी ते ओल्ड गोवा दरम्यान विशेष अशा रिव्हर क्रुझच्या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये डायलिसिसच्या रुग्णांना त्यांच्या नेहमीच्या दिवसांतून मुक्ती मिळून त्यांचे जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते.

गोव्याच्या मांडोवी नदी वरील हरीत अशा पट्ट्यातून जातांना त्यांना एक नवचैतन्य देणारा अनुभव प्राप्त तर झालाच पण त्याच बरोबर गोव्याच्या जलसंस्कृतीच्या सौंदर्याची अनोखी झलकही पहायला मिळाली. ही केवळ एक आनंददायी सहलच नव्हे तर या प्रवासामुळे त्यांना एकत्रित पणाची आणि समाजाप्रती असलेल्या आदराची माहिती मिळाली त्याच बरोबर उबदार अशा प्रेमासह त्यांच्या शारीरीक आणि मानसिक उध्दारासाठीही सहकार्य करण्यात आले.

आरोग्य क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थिती मुळे त्यांना मदत आणि सल्ला प्राप्त होऊन सर्वसमावेशक काळजी ही उपचारांपुरती मर्यादित न राहता त्या पलिकडे जाऊन उपचार घेण्याबद्दल माहिती देण्यात आली. त्याच बरोबर अगदी आनंददायी अशा उपक्रमांसह खेळ आणि अन्य उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते ज्यामुळे सहभागी लोकांच्या चेहेर्‍यावरील हास्य खुलुन आले. या भेटी मुळे योग्य संभाषण होऊन लोकांना त्यांचे आनंद, अनुभव आणि प्रोत्साहक गोष्टी ऐकण्याची संधी मिळाली.

या क्रुझवरील फेरीनंतर सहभागी लोक हे पास्टोरल इन्स्‍टिट्यूट, सेंट पायस येथे जमा झाले आणि त्यानंतर सेंट पायस येथील पॅस्टोरल इन्स्टिट्यूट चे संचालक फा. कँडिडो फर्नांडिस यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभात भाग घेतला, या भोजन समारंभाचे आयोजन हे मोहन फाऊन्डेशनच्या सहकार्याने करण्यात आले होते.

मणिपाल हॉस्पिटल गोव्याचे लीड कन्सल्टंट- नेफ्रॉलॉजी आणि ट्रान्सप्लान्ट फिजिशियन डॉ. अमोल महालदार यांनी सांगितले, मणिपाल हॉस्पिटल गोवामध्ये आमचा असा विश्वास आहे की आजारपण हे उपचारां बरोबरच अन्य गोष्टींमुळेही बरा होऊ शकतो. या ‍रिव्हर क्रुझ मुळे रुग्णांना मुक्त होऊन, एकमेकांशी जोडले जाऊन आशेचे किरण प्राप्त होण्यास मदत झाली. आम्ही रिव्हर नेव्हिगेशन विभाग, मोहन फाऊन्डेशन आणि आयएमए गोवा यांचे हा उपक्रम यशस्वी केल्या बद्दल आभार मानतो.

Trending

Exit mobile version