गोवा खबर

पणजी शिगमोत्सव समितीतर्फे विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

Published

on

पणजी शिगमोत्सव समितीच्या स्पर्धांचा निकाल जाहीर करताना शांताराम नाईक. सोबत मंगलदास नाईक, किशोर नार्वेकर व इतर.
Spread the love

गोवा खबर : पणजी शिगमोत्सव समितीतर्फे शनिवारी पणजी राजधानीत काढलेल्या भव्य शोभायात्रेतील चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य व वेशभूषा स्पर्धेचा निकाल सोमवारी पत्रकार परिषदेत, समितीचे कार्यकारी अध्यक्ष मंगलदास नाईक, सचिव शांताराम नाईक, कार्यकारी सदस्य किशोर नार्वेकर व इतर सदस्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला.

चित्ररथ स्पर्धेतील ७५ हजार रुपयांचे प्रथम बक्षीस दुर्गाभाट फोंडा येथील त्रिवेणी कला संघाला, रोमटामेळ स्पर्धेतील ७५ हजार रुपयांचे प्रथम बक्षीस शिरोडा येथील मंडलेश्वर मानगरू शिगमोत्सव मंडळाला तर लोकनृत्य स्पर्धेतील २५ हजार रुपयांचे प्रथम बक्षीस सावईवेरेंचो सख्याहरी पथकाला प्राप्त झाले. वेशभूषा स्पर्धेतील मोठ्या गटातील २० हजाराचे प्रथम बक्षीस सिद्धेश मराठे याला तर छोट्या गटातील ५ हजाराचे प्रथम बक्षीस कियान नाईक याला प्राप्त झाले. चित्ररथ स्पर्धेतील व रोमटामेळ प्रथम तीन विजेत्यांना धेंपे ग्रुप ऑफ कंपनीज तर्फे अनुक्रमे १५, १० व १० हजाराची बक्षिसे अतिरिक्त बक्षिसे प्राप्त झाली आहेत.

चित्ररथ स्पर्धा 

दुसरे बक्षीस – महालक्ष्मी नागरिक समिती, बांदोडा, तृतीय – कुंभारजुवा नागरिक समिती, चौथे – श्री देव धाडेश्वर स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब, नेरूल, पाचवे – धाडसाखळ स्टार स्पोर्ट्स कल्चरल क्लब, खांडोळा . उत्तेजनार्थ – १) बाल गोपाल कला सांस्कृतिक मंडळ, चिंबल, २) कासवाडा नागरिक समिती, तळावली, ३) आडपई युवक संघ, ४) देव बोडगेश्वर युवक संघ, बस्तोडा, ५) रासई युथ असोसिएशन, ६) हनुमान युवक संघ, वेरे, ७) रवळनाथ राष्ट्रोळी सातेरी युवक संघ मोयरा, ८) श्रीकृष्ण हौशी मंडळ, मडगाव, ९) काजरेश्वर मंडळ, कुचेली, १०) सातेरी युवक मंडळ, कार्मिभाट, मेरशी, ११) खोर्ली नागरिक समिती, तिसवाडी, १२) शिवराय युवक मंडळ, सांगे, १३) देवतेवाडा युवक मंडळ, कुडचडे, १४) राखणेश्वर युवक संघ, बोरी, १५) हर हर महादेव कलासंघ, पर्ये, १६) देव राष्ट्रोळी कला मंडळ, गिरी, म्हापसा, २७) ताळगाव युथ बारभाट, १८) श्री दामबाब प्रसन्न, मडगाव, १९) थ्री किंग माशेल, २०) शांतादुर्गा प्रसन्न, मडगाव,

रोमटामेळ स्पर्धा 

दुसरे – अवेडेकर समाज बोरी, तिसरे – सुयोग शिगमोत्सव मंडळ, आडपई, चौथे – डोंगरी शिगमोत्सव समिती, पाचवे – कुडचडे काकोडा शिगमोत्सव मंडळ, उत्तेजनार्थ – १) स्वरसाई शिगमोत्सव मंडळ, म्हापसा, २) तोणयेश्वर शिगमोत्सव मंडळ, साखळी, ३) खांडेपार शिगमोत्सव समिती, ४) चंद्रेश्वर भूतनाथ शिगमोत्सव, केपे, ५) शांतादुर्गा बोडगेश्वर मंडळ, बार्देस, ६) हिंदवी स्वराज्य दिवाडी शिगमोत्सव समिती, ७)  पाईकदेव शिगमोत्सव समिती, सांगे, ८) शांतादुर्गा लक्ष्मी नरसिंह साखल्यो संस्थान, सांकवाळे, ९) श्रीराम विश्वकर्मा शिगमोत्सव समिती, १०)  शांतादुर्गा बाबरेश्वर युवक संघ, कळंगुट.

लोकनृत्य स्पर्धा

दुसरे- सरस्वती कला मंडळ केळबाई कुर्टी फोंडा, तिसरे – विजया कला मंडळ, कुर्टी, चौथे – टिटो स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब, पैंगीण, पाचवे – शांतादुर्गा शिवरंजनी कला संघ, कुर्टी.

उत्तेजनार्थ १) नवदुर्गा कला आणि सांस्कृतिक मंडळ, मडकई, २) परशुराम कला संघ, काणकोण, ३) नवदुर्गा कला क्रीडा संघ, काणकोण, ४) घडवंश लोकमांड, केरी, सत्तरी, ५) आदिपुरुष काणकोण, ६) शिक्षा व्हिजन लेझियम ग्रुप, डिचोली.

वेशभूषा स्पर्धा 

मोठा गट : दुसरे – धनंजय नाईक, तिसरे-रुद्राज नाईक, चौथे – जीविका नाईक, पाचवे – संजय नाईक, उत्तेजनार्थ -१) वैभव देसाई, २) शिवा नाईक, ३) संदिप मयेकर, ४) माया साळगावकर, ५) सुरेखा किनळेकर, ६) रामचंद्र गवाणकर, ७) शंकरनाथ पारवडकर, ८) सोहम मडकईकर, ९) यादव गावडे, १०) रामा खांडेपारकर.

छोटा गट : दुसरे – मयुरी कोरगावकर, तिसरे – तनुश्री वाडीकर, चौथे – श्रेयन उदयकर,५) दियांश पेडणेकर, उत्तेजनार्थ- १) ओजस मेस्ता, २) वेद सातार्डेकर, ३) सान्विका कुमार, ४) रिधांत रेडकर, ५) विवान महाले, ६) अनैशा पांगम, ७) चारुही मसुरकर, ८) तेजल गावस, ९) अंश पाटील, १०) राजवी राजू बोरकर.

Trending

Exit mobile version