गोवा खबर

मध्य आशियाई युवा प्रतिनिधी मंडळाने घेतली राज्यपालांची भेट

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्याच्या ३ दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या मध्य आशियाई युवा शिष्टमंडळाने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची राजभवनातील जुने दरबार सभागृहात भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. या भेटीचा उद्देश भारत आणि मध्य आशियाई राष्ट्रांमधील युवा सहकार्य, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि राजनैतिक संबंध मजबूत करणे असा आहे.

यावेळी क्रीडा मंत्री गोविंद गावडे, राज्यपालांचे सचिव एमआर एम राव, आयएएस आणि भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अवर सचिव मंजुळा जुनेजा उपस्थित होत्या.

भारताची लोकप्रियता समृद्ध आहे जी त्याच्या समृद्ध संस्कृती, इतिहास आणि जगाला दिलेल्या योगदानाच्या विविध पैलूंमुळे आहे. भारत नेहमीच कोणत्याही पैलूंमध्ये भेदभाव न करता लोकांचे स्वागत करतो, असे पिल्लई म्हणाले.

राज्यपालांनी अशा युवा देवाणघेवाण कार्यक्रमांमुळे मध्य आशियासोबत प्रादेशिक शांतता, मैत्री आणि आर्थिक भागीदारीप्रती भारताची वचनबद्धता बळकट होते असे सांगितले.

गावडे यांनी शिष्टमंडळाची भेट भविष्यातील सहकार्यासाठी, आंतर-सांस्कृतिक समज, नेतृत्व विकास आणि प्रमुख क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्यासाठी महत्वाची ठरेल असे सांगितले.

शिष्टमंडळात कझाकस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान या देशातील १०० सदस्यांच्या समावेश होता. या भेटीचा उद्देश मध्य आशियाई देश आणि भारतातील युवकांमध्ये अधिक परस्पर समन्वय निर्माण करणे असा आहे. भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अवर सचिव मंजुळा जुनेजा यांनी आभार मानले.

Trending

Exit mobile version