गोवा खबर:राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गुजराती समाज शैक्षणिक ट्रस्ट आणि स्पेशल स्कूल, मडगाव आणि नंतर डॉ. अल्फ्रेडो अंताव होम फॉर एज्ड, चांदोर येथे भेटी दिल्या आणि दोन्ही संस्थांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली.
माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार श्री दिगंबर कामत, ट्रस्टचे अध्यक्ष श्री मुकेश सगलानी आणि इतरांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी श्री एम आर एम राव, आयएएस, राज्यपालांचे सचिव, श्री मिहीर वर्धन, विशेष अधिकारी, श्री अजित पंचवाडकर, संचालक, समाज कल्याण आणि श्रीमती वर्षा नाईक, संचालक उपस्थित होते.
सुरवातीस ट्रस्टचे अध्यक्ष श्री मुकेश सगलानी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि गुजराती समाज शैक्षणिक ट्रस्ट आणि स्पेशल स्कूलच्या उपक्रमांची माहिती दिली.
आपल्या भाषणात राज्यपालानी भारतीय संविधानाने भारतीय जनता सर्वोच्च आहे असे सांगितले. “आमदार, मंत्री किंवा मी, आपण सर्वजण गोव्याच्या लोकांची सेवा करण्यासाठी येथे आहोत,” असे राज्यपालांनी पुढे सांगितले.
पुढे बोलताना राज्यपालानी”देवाच्या कृपेने राज्यासाठी योगदान देण्याचे मला भाग्य लाभले आहे. लोकांची सेवा ही देवाची प्राप्ती करण्याचा एक मार्ग आहे आणि राजभवनाच्या माध्यमातून सेवाभिमुख उपक्रम सुरू ठेवण्याचे माझे ध्येय आहे, जे ‘लोकभवन’ असावे असे मला वाटते असे सांगितले. राज्यपालांनी गोव्यातील लोकांना मनापासून संबंध निर्माण करण्यासाठी राजभवनला भेट देण्याचे आमंत्रण दिले.
कार्यक्रमाला संबोधित करताना श्री दिगंबर कामत यांनी राज्यपाल श्री श्रीधरन पिल्लई हे एक अद्वितीय राज्यपाल आहेत, ज्यांनी संपूर्ण गोव्यात प्रवास केला आहे आणि गोव्यातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांशी स्वतःला परिचित केले आहे. त्यांनी लोकांशी संवाद साधला आहे आणि त्यासाठी ते राज्यातील गरजू लोकांना मदत करीत आहेत असे श्री कामत पुढे म्हणाले.
Celebrate the vibrant #ShigmotsavParade2025 as it travels across Goa from March 15-29
पुढे बोलताना श्री कामत यांनी ट्रस्टला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि सांगितले की गुजराती समाज शैक्षणिक ट्रस्ट मुलांना मदत करण्यासाठी आणि त्यांना पालकांचे प्रेम आणि आपुलकी देण्यासाठी सतत कार्यरत आहे असे सांगितले.
विशेष अधिकारी श्री मिहीर वर्धन यांनी राजभवनाने राबविलेल्या विविध उपक्रमांबद्दलची माहिती दिली आणि राज्यातील गरजू रुग्णांना आणि ९७ संस्थांना ६.२६ कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती दिली.
राज्यपालांनी गुजराती समाजाचे अध्यक्ष श्री संतोष पोलकर, श्री देवीदास सुरवंत, श्री झहीर शेख आणि सुनीता फर्नांडिस यांना आर्थिक मदत सुपूर्द केली.
चांदोर येथे आगमन झाल्यावर विरोधी पक्षनेते श्री युरी आलेमाव, डॉ. अल्फ्रेड अंताव होम फॉर एज्डचे अध्यक्ष श्री जॅसिंतो फर्नांडिस आणि इतरांनी राज्यपालांचे पुष्प अर्पण करून स्वागत केले.
याप्रसंगी सरपंच श्री युजिनियो डायस आणि पंच उपस्थित होते.
चांदोर येथील कार्यक्रमात बोलताना श्री युरी आलेमाव यांनी राज्यपालांचे हृदय सोनेरी आहे आणि ते गरिबांच्या उन्नतीसाठी त्यांच्या निधीचा वापर करीत आहेत. “राजभवन त्यांच्या संसाधनांचा वापर गरिबांच्या उन्नतीसाठी करीत असलेल्या उपक्रमांबद्दल ऐकणे नेहमीच आनंददायी असते,” असे श्री आलेमाव पुढे म्हणाले.