गोवा खबर

वेलिंगकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘गोमस’ शताब्दीपूर्ती महोत्सव समितीची स्थापना

Published

on

Spread the love

गोवा खबर : १९२५ साली स्थापना झालेला गोमंतक मराठा समाज यंदा २०२५ साली आपले शतक पूर्ण करीत आहे. हा महोत्सव साजरा करण्यासाठी प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या अध्यक्षतेखाली गोमंतक मराठा समाज शताब्दीपूर्ती महोत्सव समिती गठित करण्यात आलेली असून त्यांच्याच नेतृत्वाखाली नियोजन करण्यासाठी एक २०- सदस्यीय सुकाणू समिती निवडण्यात आली आहे, अशी माहिती गोमंतक मराठा समाज केंद्रीय कार्यकारिणीचेअध्यक्ष कालिदास खांडेपारकर यांनी दिली.

सुकाणू समितीत प्रा. उमेश नाईक, नितीन मार्दोळकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, प्रा. गजानन मांद्रेकर, प्रा. गोरख मांद्रेकर, ॲड. सुरेश काणकोणकर, आनंद वाघुर्मेकर, दिनेश नाईक, किरण बाळ्ळीकर, सतीश पैंगिणकर, सलील नाईक, विवेक नाईक, प्रशांत मांद्रेकर, श्रीकृष्ण आसकावकर, मनीषा नाईक, रमेश नाईक आमोणकर व पदसिद्ध सदस्य, कालिदास खांडेपारकर (अध्यक्ष), उत्कर्ष बाणस्तारकर (सेक्रेटरी), प्रभाकर मांद्रेकर (खजिनदार) यांचा समावेश आहे.

काही अपरिहार्य कारणास्तव सदर समिती-स्थापना प्रक्रियेस लागलेल्या विलंबामुळे २०२५ च्या शताब्दीवर्षाचा फक्त तीन महिन्यांचाच कालावधी उपलब्ध असला तरी जोडून असलेला मे २०२५ ते मे २०२६ हा कालावधीही शतकोत्तर वर्ष म्हणून महोत्सव समितीला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

यापूर्वी गोमंतक मराठा समाजाने २००० साली माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली अमृतमहोत्सवी सोहळा साजरा केला होता. यंदाच्या शताब्दीपूर्ति व शतकोत्तर वर्ष महोत्सवाच्या आयोजनाची संघटनात्मक व व्यवस्थापक बांधणी करण्यासाठी एक महत्वाची व्यापक कार्यकर्ता बैठक २३ मार्च रोजी सकाळी ९.३० ते दुपारी भोजनापर्यंत या वेळेत आयोजित केलेली आहे.

या बैठकीस सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, कार्यवाह, कोषाध्यक्ष,  युवा आणि महिला प्रमुख तसेच याव्यतिरिक्त, अन्य ३/४ सक्रीय कार्यकर्ते, आणि महोत्सव सुकाणू समितीचे सर्व सदस्य, केंद्रीय कार्यकारिणीचे सर्व सदस्य, तसेच सुरुवातीपासूनच्या समाजाच्या त्या त्या वेळच्या केंद्रीय कार्यकारी समित्यांचे सदस्य अपेक्षित आहेत.

समाजाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर होणाऱ्या  या व्यापक बैठकीला अपेक्षित  सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वेलिंगकर आणि खांडेपारकर यांनी केले आहे.

Trending

Exit mobile version