गोवा खबर

राजधानीत 22 रोजी शोभायात्रा

Published

on

Spread the love
  • पणजी शिगमोत्सव समितीतर्फे पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

गोवा खबर : पणजी शिगमोत्सव समितीतर्फे राजधानीत वर्षपद्धतीप्रमाने पाच दिवसीय शिगमोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ मार्च रोजी शिगमोत्सव शोभायात्रा होणार आहे. तसेच आझाद मैदान येथे १९ ते २३ मार्च दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्मार्ट सिटीच्या कामामुळे शिगमोत्सव शोभायात्रा जुने सचिवालय ते कांपालपर्यंत यंदा असेल, अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली.

पणजी शिगमोत्सव समितीच्यावतीने मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आले. यावेळी शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष तथा उद्योगपती श्रीनिवास धेंपो, शांताराम नाईक व मंगलदास नाईक उपस्थित होते. २३ रोजी संतोष रायकर, महादेव नाईक व आवितो फर्नांडिस यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

होळीच्यानिमित्ताने १४ रोजी आझाद मैदान येथे रंगपंचमी असणार आहे. १९ रोजी ओंकार मेलोडी ऑकेस्ट्रा. शोभायात्रेसाठी १० लाख ५७ हजार रुपयांची बक्षिसे दिली जातील. वेळेचे बंधनामुळे केवळ ३५ चित्ररथ, १० रोमटामेळ व २० वेशभूषा स्पर्धकांना सहभागी करुन घेण्यात येईल, असे धेंपो यांनी सांगितले.

२० रोजी ‘मिस्टर आणि मिसेस दाबोळकर’ हे नाटक, २१ रोजी ‘रुपेरी वाळुत’हा मराठी भावगीत व भक्तिगीत कार्यक्रम, २२ रोजी शोभायात्रा तर २३ रोजी ‘एका पेक्षा एक अप्सरा’ असा लावणीचा कार्यक्रम होणार आहे, असे उद्योगपती धेंपो यांनी सांगितले.

Trending

Exit mobile version