गोवा खबर

फर्स्ट फ्रायडे मीटअप : गोव्यातील सर्जनशील समुदाय एआय, डिझाइन आणि नावीन्याच्या शोधात

Published

on

Spread the love

गोवा खबर : द क्रिएटिव्ह कम्युनिटी ऑफ गोवातर्फे (सीसीजी), असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय), गोवा चॅप्टर यांच्या सहकार्याने आयटी हब, आल्तिन येथे फर्स्ट फ्रायडे मीटअपच्या (पहिला शुक्रवार बैठक) १० व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते. स्टार्टअप अँड आयटी प्रमोशन सेल, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स खाते गोवा सरकारद्वारे समर्थित असलेल्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट डिझाइनर, तंत्रज्ञानशास्त्रज्ञ आणि उद्योजकांना त्यांच्या कल्पना सामायिक करण्यासाठी आणि कामात नाविन्य आणण्यासाठी एकत्र आणण्याचे आहे.

या कार्यक्रमात मोझॅकच्या औद्योगिक डिझायनर आणि सह-संस्थापक रेबोनी साहा हिचे “प्रॉडक्ट डिझाइन इन गोवा” या विषयावर सादरीकरण झाले. तिचा अनुभव सामायिक करताना तिने सांगितले, गोवा, जो आपल्या वारसा आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो, तो उत्पादन डिझाइन आणि नाविन्यपूर्णतेचे केंद्र बनला आहे. १९९४ पासून गोव्यात काम करत असलेल्या साहा हिने पॅकेजिंग, वाहतूक आणि स्थानिक कारागीर व अभियंते यांच्या सहकार्याने औद्योगिक डिझाइनमध्ये योगदान दिले आहे. डिझाइन क्षेत्र कसे लोक-केंद्रित आहे आणि गोव्यातील उत्पादन वाढीमुळे व्यावहारिक आणि संबंधित उत्पादनांच्या विकासासाठी नवीन संधी कशा निर्माण होतात, यावर या चर्चेने प्रकाश टाकला.

तंत्रज्ञान सल्लागार अशोक हेगडे, यांनी “क्रिएटिव्ह क्षेत्रात तंत्रज्ञान आणि एआय” या विषयावर भाषण दिले. त्यांनी डिजिटल कला आणि साहित्यातील एआयची भूमिका, सत्यता आणि मालकी यावर होणारे परिणाम आणि नैतिक चिंता यावर भाष्य केले. या सत्रामध्ये एआय-जनरेटेड काम ओळखण्यासाठी आवश्यक साधनांचा समावेश होता. तसेच सर्जनशील सामग्रीचे रक्षण करण्यासाठी कॉपीराइट नोंदणी आणि ब्लॉकचेन प्रमाणीकरण यासारख्या पद्धतींवर भर देण्यात आला होता. कलात्मक आणि साहित्यिक कार्यास समर्थन देण्यातील एआयची भूमिका, यासह त्यात येणाऱ्या आव्हानांवर देखील त्यांनी चर्चा केली.

गोवा सरकारच्या स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलचे सीईओ डी. एस. प्रशांत यांनी विकसित होत असलेल्या परिसंस्थेवर आपले विचार मांडले. ते म्हणाले, गोव्याची स्टार्टअप आणि आयटी परिसंस्था नवकल्पना, धोरण समर्थन आणि समृद्ध सर्जनशील समुदायामुळे झपाट्याने विस्तारत आहे. तुये येथील इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) मधील आगामी डिझाईन व्हिलेज हे एक गेम चेंजर ठरेल. जे तंत्रज्ञान, डिझाइन आणि उत्पादनाला एकत्र आणून गोव्याच्या भविष्याला सर्जनशीलता आणि उद्योजकतेचे केंद्र म्हणून चालना देईल. माननीय पर्यटन, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स तथा प्रिंटिंग आणि स्टेशनरी मंत्री रोहन ए. खंवटे यांच्या संकल्पनेनुसार, गोवा एक वेगवान परिसंस्था तयार करत आहे जिथे स्टार्टअप्स, आयटी नेते आणि डिझायनर्स भविष्यासाठी उपाय व पर्याय तयार करण्यासाठी सहयोग करतील.

Trending

Exit mobile version