गोवा खबर

निकृष्ट दर्जाचे गूळ, जिन आणि फायरबॉल व्हिस्की विकल्याबद्दल दंड

Published

on

Spread the love

गोवा खबर : अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाने उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचे गूळ, जिन आणि फायरबॉल व्हिस्कीचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या अन्न व्यवसाय चालकांना दंड ठोठावला आहे.

परवानगी नसलेल्या, कमी दर्जाच्या गुळाची विक्री केल्याबद्दल मेसर्स राजवीर ट्रेडर्स, सोहनलाल घांची, दुकान क्रमांक २, आनंद विहार, पेडे, म्हापसा,  मेसर्स दीपक ट्रेडर्स, दीपक केसरकर, दुकान क्रमांक जी-२२, फेज २, सत्तादार आर्केड, पेडे, म्हापसा आणि मेसर्स आर्यन मिनी सुपरमार्केट, जितेंद्र हलर्णकर, घर क्रमांक ८१५/१६(४), महाखाजन, धारगळ, पेडणे यांना प्रत्येकी ३०००/- रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

परवानगी नसलेल्या कृत्रिम रंग (एरिथ्रोसिन) असलेले सब-स्टँडर्ड उदयपूर गुलाब जिन विकल्याबद्दल मेसर्स गॅलेस्टॉर्म डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड, प्रवीण कुमार अग्रवाल, प्लॉट क्रमांक ६२, पिसुर्ले इंडस्ट्रियल इस्टेट, सत्तरी; मेसर्स सॉकहोम डिस्टिलर्स अँड व्हिंटर्स प्रायव्हेट लिमिटेड, मुकेश जैन, दुकान क्रमांक जी-२ आणि जी-३, ग्राउंड फ्लोअर, जर्नलिस्ट कॉलनी, साई सर्व्हिसच्या मागे, पर्वरी, आणि मेसर्स फेदर वेट वाईन्स, रोहन भारद्वाज, एच. नं. ११४६/बी, बागवाडो, मोरजी, पेडणे यांना प्रत्येकी ५०,०००/- रुपये दंड ठोठावण्यात आला.

त्याचप्रमाणे फायरबॉल सिनामन फ्लेवर्ड व्हिस्की” विकल्याबद्दल मायकल जॉन डिसूझा, मेसर्स जॉन डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट क्रमांक एम-२१/एम-२१ए आणि एम-२१बी, कुंकळी इंडस्ट्रियल इस्टेट यांना ५०,०००/- रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

Trending

Exit mobile version