गोवा खबर

नाविकांना सूचना

Published

on

Spread the love

गोवा खबर : शिक्षा निकेतन स्कुल, तोर्डा बार्देश यांनी शाळेच्या शालेय मुलांसाठी २३ मार्च रोजी सकाळी ११.१५ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत   मांडवी नदीत रेईश मागूस फोर्ट ते फॉरेस्ट पार्क, कांपाल असा जलतरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.  

त्यासाठी वरील जल मार्ग क्षेत्रात वाहतूक करणाऱ्या सर्व बार्जेंस, प्रवासी लाँच, क्रुईज बोटी, जल क्रिडा बोटी, होड्या, फेरीबोटी, मच्छिमारी बोटी आणि इतर यांत्रिकी व बिनयांत्रिकी नाविकांनी मांडवी नदीत जलतरण करणाऱ्या मुलांना कोणताही अडथळा येणार नाही म्हणून वरील काळात लक्ष ठेऊन सावकाश वाहतूक करावी आणि गरज पडल्यास सुरक्षित अंतरावर थांबावे. तसेच गस्तीवर असलेल्या बोटीवरून लाल बावटा दाखवून देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे असे बंदर कप्तान खात्याने कळविले आहे.

Trending

Exit mobile version