गोवा खबर

कृषी मंत्रालयातर्फे प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जारी

Published

on

Spread the love

गोवा खबर : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे वर्ष 2024-25 साठीचा प्रमुख कृषी पिकांच्या (खरीप आणि रबी) उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जारी केला आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महत्त्वाच्या कृषी पिकांचा डाटा मंजूर करून तो जारी करताना सांगितले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहे.केंद्रीय कृषी मंत्रालय विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत तसेच प्रोत्साहन देत असून त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे हे सांगण्यावर त्यांनी अधिक भर दिला.

राज्यांकडून मिळालेली लागवड क्षेत्राबद्दलची माहिती दूरस्थ संवेदके, साप्ताहिक पीक हवामान निरीक्षण गट आणि इतर संस्थांकडून प्राप्त माहितीशी प्रमाणित करून बघण्यात आली आहे. तसेच उद्योगांचे प्रतिनिधी तसेच इतर सरकारी विभागांचे प्रतिनिधी यांची खरीप आणि रबी हंगामाच्या संदर्भातील मते, दृष्टीकोन आणि भावना जाणून घेण्यासाठी  कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने हितधारक सल्लामसलत उपक्रम आयोजित केला. यातून हाती आलेले निष्कर्ष देखील अंदाजांना अंतिम स्वरूप देताना विचारात घेण्यात आले आहेत. तसेच, पीक उत्पादनाविषयीचे हे अंदाज पीककापणीचे अनुभव (सीसीईज), भूतकाळातील कल आणि इतर सहयोगी  घटकांवर आधारित आहेत.

यावर्षी खरीप हंगामात 1663.91 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन होईल तर रबी हंगामात 1645.27 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Trending

Exit mobile version