-
मुंबई येथे ‘नेतृत्व आणि शासन’ या संकल्पनेवर आधारित पहिल्या ‘मुरली देवरा स्मृती संवाद’ कार्यक्रमात उपराष्ट्रपतींचे भाषण
गोवा खबर : “लोकशाहीकडून ‘भावनाशाही’ कडे झालेल्या स्थित्यंतराची दखल घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विचारमंथनाची गरज आहे,” असे सांगत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज लोकशाहीकडून ‘भावनाशाही’ कडे झालेल्या बदलाबाबत राष्ट्रीय पातळीवर चर्चा घडवण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले की, “भावनांनी प्रेरित धोरणे, भावनांच्या आधारावर केलेल्या चर्चा आणि भाषणे उत्तम प्रशासनाला धोका निर्माण करतात. लोकांना क्षणभरासाठी सक्षम न बनवता त्यांच्यामध्ये स्वतःला सक्षम करण्याची क्षमता निर्माण करायला हवे कारण तात्पुरत्या सक्षमतेमुळे त्यांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो.”
मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘नेतृत्व आणि शासन’ या संकल्पनेवर आधारित पहिल्या ‘मुरली देवरा स्मृती संवाद’ कार्यक्रमात उद्घाटनपर भाषण करताना उपराष्ट्रपती धनखड यांनी राजकीय क्षेत्रात होत असलेले तुष्टीकरणाचे राजकारण आणि शांतीकरणविषयक रणनीतींच्या उदयाबाबत चिंता व्यक्त केली. निवडणुकीतील वचने पाळण्यासाठी अवाजवी खर्च केला तर पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याची देशाची क्षमता त्या प्रमाणात कमी करतो. विकासविषयक परिस्थितीसाठी हे मारक ठरते. लोकशाहीत निवडणुका महत्त्वाच्या आहेत पण त्याच एकमेव महत्त्वाचा घटक नाहीत.
यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी माजी खासदार दिवंगत मुरली देवरा यांच्या स्मृतींना धनखड यांनी आदरांजली वाहिली, ते राजकीय क्षेत्रात असलेले, सार्वजनिक जीवनातले सर्वोत्तम व्यक्तिमत्वांपैकी एक होते असे ते म्हणाले. राजकीय क्षेत्रातील असलेल्यांपैकी मुरली देवरा हे सर्वोत्तम सार्वजनिक व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते, त्यांनी आयुष्यभर मैत्री जपली. त्यांनी कायमच मतभेद मिटवले आणि ते सगळ्यांचेच आवडते होते असे धनखड यांनी सांगितले. त्यांचा कोणीही विरोधक नव्हता, या एकाच गोष्टीची त्यांच्या आयुष्यात कमतरता होती, आणि हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते असे ते म्हणाले.
मुरली देवरा यांनी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी आणण्यात मोठी भूमिका बजावली, आणि देशाचे धूम्रपानाच्या धोक्यांपासून रक्षण केले अशा शब्दांत धनखड यांनी देवरा यांच्या कार्याची प्रशंसा केली. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी यावी यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचेही दरवाजे ठोठावले आणि न्यायालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळवल्याची आठवणही धनखड यांनी श्रोत्यांना करून दिली.