गोवा खबर

भारतीय लष्करास शौर्याचा मोठा इतिहास : राज्यपाल

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारतीय सैन्याला शौर्य आणि बलिदानाचा दीर्घ इतिहास आहे. ते देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावितात, असे  राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई म्हणाले.

नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात सहभागी झालेल्या गोव्यातील एनसीसी छात्रांचा पिल्लई यांनी सन्मान केला. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात उत्कृष्ट संचलन केल्याबद्दल पिल्लई यांनी कर्नाटक आणि गोव्यातील एनसीसीचे कौतुक केले.

प्रजासत्ताक दिनाच्या बॅनर स्पर्धेत २०२४-२५ साठी प्रतिष्ठित प्रधानमंत्री बॅनर मिळविलेल्या गोवा आणि कर्नाटक कॅडेट्सच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.

तरूणामध्ये शिस्त, देशभक्तीची भावना आणि नेतृत्वगुण रूजविण्यास एनसीसीची महत्वाची भुमिका असल्याचे सांगितले. छात्र तुहीन साहा, दामोदर महाविध्यालय, मडगाव, छात्र श्रीदित्य सावंत, जीएस आमोणकर विध्या मंदिर म्हापसा, वेदांत चांदेकर, सेंट झेव्हीयर महाविध्यालय म्हापसा यांनी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात भाग घेतला.

यावेळी राज्यपालांहस्ते एनसीसी छात्रांना प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. एनसीसी विभागाचे उपमहासंचालक एस. अरूण कुमार यांनी स्वागत केले.

Trending

Exit mobile version