गोवा खबर

७ मार्च रोजी डिचोलीत शिवसेना कार्यकर्ता मेळावा

Published

on

Spread the love

गोवा खबर : शिवसेना पक्षाचे मुख्‍य नेते तथा महाराष्‍ट्र राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्‍येष्‍ठ नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांची गोवा राज्‍याच्‍या संपर्कनेते तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक सुभाष सावंत यांची गोवा राज्‍य संपर्कप्रमुखपदी नुकतीच नियुक्‍ती केली आहे. 

१९९० साली शिवसेना-भाजपा युतीच्‍या काळात गजानन कीर्तिकर व गोव्‍याचे माजी मुख्‍यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सुरूवातीच्‍या काळात गोव्‍यामध्‍ये पक्ष संघटना वाढीसाठी प्रचंड मेहनत घेतली. शिवसेना पक्ष संघटनेच्‍या पुर्नबांधणीसाठी ८ मार्च रोजी सायं. ५ वाजता पुजा फार्महाऊस, नानोडा, डिचोली येथे जुन्‍या शिवसैनिकांचे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरला कीर्तिकर, सावंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक उपेंद्र गावकर व काशिनाथ मयेकर यांनी केले आहे.

Trending

Exit mobile version