गोवा खबर

अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बीबीएसएसएलची आढावा बैठक

Published

on

Spread the love

गोवा खबर : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडची (बीबीएसएसएल) पारंपारिक बियाण्यांसंदर्भात आढावा बैठक झाली.  भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड (बीबीएसएसएल) पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय मंत्री अमीत शाह यावेळी म्हणाले.

देशाच्या विविध भागातील काही निवडक पारंपारिक बियाण्यांचे सेंद्रिय उत्पादन घ्यावे, आणि खरीप 2025 हंगामापासून बाजारात ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध करावे, अशी सूचना त्यांनी केली.

यामध्ये अमरेली बाजरी (गुजरात), उत्तराखंड गहाट (हॉर्स ग्राम), उत्तराखंड मांडू (फिंगर मिलेट), बुंदेलखंड मेथी (मेथी), कथिया गहू, मुनस्यारी राजमा, कला भट्ट, चार प्रकारचा काला नमक तांदूळ, जुही भात (बंगाल) आणि गोपाल भोग धान (बंगाल), या प्रमुख बियाण्यांचा समावेश आहे.

देशभरातील फळे, भाजीपाला आणि अन्नधान्याच्या सर्व पारंपारिक बियाण्यांचा सर्वसमावेशक डेटाबेस तयार करावा आणि त्यांचे संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा राबवावा, अशी सूचना केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी केली.

Trending

Exit mobile version