गोवा खबर : शिवाच्या उपासनेसह विविध विषयांवर भाविकांना शास्त्रीय माहिती मिळावी आणि राष्ट्र, धर्म, आयुर्वेद, बालसंस्कार आदी विविध विषयांवरील ग्रंथसंपदेचा लाभ व्हावा, यासाठी महाशिवरात्रीच्या निमित्ताने २६ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने गोव्यात एकूण ३६ ठिकाणी या ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रंथ कक्ष लावण्यात काही महत्त्वाची ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत. श्री रूद्रेश्वर देवस्थान, हरवळे (सकाळी ९ ते रात्री ८); श्री सप्तकोटेश्वर मंदिर, नार्वे, डिचोली (सकाळी ८ ते सायं. ७); श्री मुळवीर देवस्थान, मालपे, पेडणे (सकाळी ९ ते सायंकाळी ६); श्री दामोदर मंदिर, वास्को (सकाळी ९ ते रात्री ९); श्री दामोदर लिंग देवस्थान, फातोर्डा, मडगाव (सकाळी ९ ते रात्री ९); श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा (सकाळी १० ते रात्री १०); श्री रवळनाथ शांतादुर्गा महादेव मंदिर, मासोर्डे, वाळपई (सकाळी ९.३० ते सायंकाळी ५); श्री महालक्ष्मी मंदिर, पणजी, (सकाळी ७ ते सायंकाळी ७); श्री गोमंतेश्वर मंदिर, श्री क्षेत्र ब्रह्मपुरी, जुने गोवा (सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३०). या कक्षावर ग्रंथसंपदेसह गोमूत्र अर्क, जपमाळ, अगरबत्ती, भीमसेनी कापूर, अत्तर आदी पूजोपयोगी सात्त्विक उत्पादनेही मिळतील.