गोवा खबर : गोवा पर्यटनाने एसएटीटीई २०२५ मध्ये (दक्षिण आशिया प्रवास आणि पर्यटन विनिमय) उल्लेखनीय प्रभाव पाडला, ज्यामुळे पुनरुत्पादक पर्यटनाप्रती असलेली त्यांची वचनबद्धता अधिक दृढ झाली. पुनरुत्पादक पर्यटन हा एक आराखडा आहे जो शाश्वततेच्या पलीकडे जाऊन स्थानिक परिसंस्था, संस्कृती आणि समुदायांना सक्रियपणे पुनर्संचयित करण्यासाठी आणि त्यात वाढ करण्यासाठी कार्यरत आहे.
गोव्याचे सार टिपणाऱ्या येथील उत्साही अश्या दालनासह, गोवा पर्यटनाने यशोभूमी (आयआयसीसी), नवी दिल्ली येथे पर्यटन वाढीला पर्यावरणीय आणि सांस्कृतिक जबाबदारीसह संतुलित करणारे ठिकाण म्हणून स्वतःला स्थान देत, आघाडीच्या प्रवासी व्यावसायिक, टूर ऑपरेटर आणि उद्योग भागधारकांशी संवाद साधला. यात गोव्याच्या नाविन्यपूर्ण पर्यटन उपक्रमांवर केंद्रित चर्चा झाली, ज्यात समुदाय-केंद्रित अनुभव, पर्यावरणपूरक निवास व्यवस्था आणि वारसा संवर्धन प्रयत्नांचा समावेश होता.
गोवा शिष्टमंडळाचे नेतृत्व खंवटे यांनी केले. यावेळी जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर; गोवा सरकारचे पर्यटन सचिव संजीव आहुजा, आयएएस; पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक; पर्यटन मंत्र्यांचे ओएसडी शॉन मेंडीस; जीटीडीसीचे उपमहाव्यवस्थापक (मार्केटिंग) दीपक नार्वेकर; पर्यटन खात्याचे सहाय्यक संचालक जयेश काणकोणकर, पर्यटन खात्याच्या सहाय्यक पर्यटन अधिकारी चित्रा वेंगुर्लेकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
खंवटे यांनी सांगितले, की एसएटीटीई २०२५ मध्ये गोव्याची उपस्थिती ही पर्यटकांना आणि स्थानिक समुदायाला लाभदायक ठरणारी पर्यटन प्रतिकृती घडवण्याच्या आमच्या समर्पणाला अधोरेखित करते. या सकारात्मक प्रतिसादामुळे भविष्यात पर्यटनाचे पुनरुज्जीवन आणि अधिक भरभराट होईल व त्यासाठी आम्ही कार्यरत आहोत, याची पुष्टी होते.
गोव्याच्या शिष्टमंडळाने १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान धोरणात्मक बी२बी बैठका घेतल्या व जबाबदार प्रवासाच्या त्यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत अशा सहकार्याला चालना दिली. या सहभागाने गोव्याचे समुद्रकिनाऱ्यांपलीकडे असलेले आकर्षण, समृद्ध अंतर्गत पर्यटन, अद्वितीय सांस्कृतिक उत्सव, वेलनेस पर्यटन आणि साहसी सेवा प्रदर्शित केल्या.