गोवा खबर : युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पत्नी अक्षता मूर्ती आणि कन्या कृष्णा व अनुष्का यांच्यासह आज संसद भवनाला भेट दिली.
लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी ऋषी सुनक आणि त्यांच्या कुटुंबियांचे स्वागत केले. राज्यसभेचे महासचिव पी सी मोदी देखील या प्रसंगी उपस्थित होते.
आजच्या भेटीदरम्यान सुनक कुटुंबाने संसद भवन संकुलामध्ये फेरी मारली आणि त्याच्या वास्तुशास्त्रीय वैभवाची प्रशंसा केली. या संकुलातील दालने, कक्ष, संविधान सभागृह तसेच संविधान सदन अशा उल्लेखनीय जागांना त्यांनी भेट दिली.