(L-R) Yogiraj Kamat, president of B.P.S Sports Club, lights the ceremonial lamp alongside Sameer Kakodkar, president of the Goa State Tennis Association; Kranksy Da Costa, committee member; Santosh George, vice president of B.P.S Sports Club; and Vikram Verlekar, sports chairman of B.P.S Sports Club, at the inauguration of the second edition of the Baale BPS Open 2025
Spread the love
गोवा टेनिस असोसिएशन आणि बाले रिसॉर्टच्या विद्युत सहयोगाने राज्य मानांकन स्पर्धेचे आयोजन
गोवा खबर : मडगाव बीपीएस स्पोर्ट्स क्लब येथे बाले बीपीएस ओपन २०२५ या राज्य मानांकन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीस कालपासून शानदार सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अर्नम घोष यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर ६-१ अशा प्रभावी विजयासह पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पुरुष एकेरी गटातील पुढील सामन्यांमध्ये पृथ्वी नाईकने किशोर मैत्रीवचा ६-० असा एकतर्फी पराभव केला, तर अनुप सरदेसाईंनी विहान प्रिजीथ कृष्णनवर ६-१ ने सहज विजय मिळवला. इतर सामन्यांमध्ये सुरेश नाईकने चेतन दत्ताराम राणे ६-२ ने पराभूत केले, राहुल पिंटोने सौरभ त्रिवेदीवर ६-३ अशी मात केली, तर जुवावं सोझाने विनोद कुमारचा ६-४ असा संघर्षपूर्ण पराभव केला.
पुरुषांच्या खुल्या एकेरी गटाच्या दुसऱ्या फेरीत निषाद शेवडे, दिमित्री स्मरनोव्ह, सिद्धार्थ नुनेस आणि प्रिन्स ॲग्नेलो जोव्हेन डी सिल्वा यांनी प्रभावी कामगिरी करत अनुक्रमे अमुल्य सेठी, जोशुआ कार्दोझो, डॉ. सूरज एस. पाटलेकर आणि जुवावं सौसावर ६-० अशा एकतर्फी विजयाची नोंद केली. अर्नम घोष यांना पहिल्या फेरीत बाय मिळाली, तर पंकज नाईक यांनी अनुप सरदेसाई आणि ॲलन फर्नांडिस यांच्यावर ६-१ अशा सहज विजय मिळवले. लिंडन जेपीने अरहान गावकरला ६-२ ने पराभूत केले, जय गिलने सौरिश नाईकवर ६-३ असा विजय मिळवला, तर पृथ्वी नाईकला कठीण सामना खेळावा लागला, पण अखेर वेस रायन कार्दोझोला ६-४ ने मात देत पुढील फेरीत स्थान मिळवले.
Arnam Ghosh advances to the quarterfinals of the Men’s Singles category after defeating Lyndon JP 6-1 in the pre-quarterfinals at the ongoing Baale BPS Open 2025.
प्री-क्वार्टर फायनल असलेल्या तिसऱ्या फेरत अर्नाम घोषने लिंडन जेपीचा ६-१ असा सहज पराभव केला. त्याचप्रमाणे सिद्धार्थ नूनेसने ओजस्वी सिंग मानविरुद्ध ६-० असा सहज विजय मिळवला.
या राज्य मानांकन टेनिस स्पर्धेला बालेरिसॉर्ट गोवा आणि गोवा स्टेट टेनिस असोसिएशन (GSTA) यांचे समर्थन लाभले आहे. बाले बीपीएस ओपन २०२५ च्या दुसऱ्या आवृत्तीला मिळालेला उत्कृष्ट प्रतिसाद पाहून आम्ही उत्साहित आहोत. दिवसाच्या सुरुवातीला झालेल्या रोमांचक सामन्यांमधून राज्यात टेनिस खेळाची वाढती लोकप्रियता स्पष्टपणे दिसून येते. गोव्यात या खेळाला व्यावसायिक स्तरावर पुढे नेण्यास मदत करत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही सर्व खेळाडूंना यशस्वी स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो,” असे बीपीएस स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष योगीराज कामत यांनी स्पर्धेच्या औपचारिक उद्घाटनप्रसंगी सांगितले.
“महिला दुहेरी आणि व्हीलचेअर टेनिस चॅलेंजर स्पर्धेची भर ही बाले बीपीएस ओपनला अधिक समावेशक आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या नवीन श्रेणींमधील उत्साह आणि प्रतिभा पाहून खूप आनंद झाला आणि आम्ही भविष्यात आणखी मोठ्या सहभागाची अपेक्षा करतो. सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा.” असे उद्घाटनप्रसंगी बोलतांना, बी.पी.एस स्पोर्ट्स क्लबचे क्रीडा अध्यक्ष विक्रम वेर्लेकर म्हणाले,
ही स्पर्धा २३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, यात १० वर्षांखालील गट आणि व्हीलचेअर टेनिस चॅलेंजर अशा विशेष स्पर्धेंचा समावेश आहे.