गोवा खबर

महर्षि विश्वविद्यालयाच्या प्रदर्शन कक्षाला १० हजारांहून अधिक भाविकांनी दिली भेट

Published

on

Spread the love

गोवा खबर : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून कुंभक्षेत्री सेक्टर ७ येथे प्रदर्शनकक्ष लावण्यात आला आहे. या प्रदर्शन कक्षाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून ११ फेब्रुवारीपर्यंत १० हजारांहून अधिक भाविकांनी कक्षाला भेट दिली.

साधू-संतांसह वैद्यक, शिक्षण, विज्ञान, प्रशासन आदी क्षेत्रांत कार्य करणार्‍या उच्चपदस्थ मान्यवरांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्याचे कौतुक केले. या प्रसंगी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’चे के.के. सिंह, ‘इस्रो’च्या निवृत्त वैज्ञानिक डॉ. नलिनी सतीश, उत्तर-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शरत चंद्रायन् यांच्यासह अनेक मान्यवरांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिले आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘राष्ट्रीय विद्यार्थी सेने’चा भाग असलेल्या उत्तरप्रदेशमधील ‘भारत स्काऊट अँड गाईड’च्या विद्यार्थ्यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून देण्यात येणार्‍या ‘व्यक्तीमत्त्व विकास आणि तणाव नियंत्रण’, या विषयावरील मार्गदर्शनाचा लाभ घेतला. उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरांचल अशा अनेक राज्यांतून, तसेच न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, युरोप अशा अनेक देशांतून आलेल्या भाविकांनीही अध्यात्मविषयीच्या वैज्ञानिक परीक्षणांविषयीची माहिती जिज्ञासेने जाणून घेतली.

अनेक जिज्ञासूंनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून आयोजित केल्या जाणार्‍या ५ दिवसीय कार्यशाळेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. या प्रदर्शनात दिली जाणारी अध्यात्मशास्त्रीय माहिती आणि त्यासमवेतच वैज्ञानिक आधार लोकांना भावला. अनेक भाविकांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालच्या कार्याशी जोडण्याची इच्छा व्यक्त केली.

 

 

 

Trending

Exit mobile version