गोवा खबर

पर्वरी मतदारसंघातील पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते बार्देझ तालुक्यातील पर्वरी येथे पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य कविता गुपेश नाईक, सरपंच बिंदिया नाईक, पेन्हा दे फ्रँका सरपंच स्वप्नील नाईक व इतर पंच सदस्य उपस्थित होते.

हा एक महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश पर्वरी मतदारसंघात साल्वादोर दो मुंडो पंचायत क्षेत्रातील धोणवाडो, क्विटला आणि सालय परिसरात पाणीपुरवठा वाढवणे आहे.

मेसर्स विब्रो कन्स्ट्रक्शनद्वारे कार्यान्वित केलेल्या या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनामध्ये धोणवाडो येथे ६५०एम³ ओव्हरहेड रिझर्वोअर (ओएचआर) बांधणे, ३००एम³ सम्प आणि २००एमएम व्यासाच्या पंपिंग मेनची तरतूद समाविष्ट आहे. हा उपक्रम या परिसरातील पाणी पुरवठ्याची टंचाई दूर करण्यासाठी सुरु करण्यात आला आहे, ज्यामुळे अंदाजे २,८०० रहिवाशांना फायदा होईल.

खंवटे यांनी पर्वरीत आवश्यक अश्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला. ते म्हणाले, कि पाणी ही समाजाची जीवनरेखा आहे, आणि अखंडित व विश्वासार्ह पाणी पुरवठा सुनिश्चित करणे, हे या सरकारचे प्राधान्य आहे. हा प्रकल्प सार्वजनिक उपयोग सुधारणे आणि नागरिकांसाठी शाश्वत उपाय प्रदान करण्याच्या आमच्या सततच्या प्रयत्नांचा पुरावा आहे. हे जलाशय सुरु करून, आम्ही वितरण साखळीत अगदी ग्रामीण भागात असलेल्या दीर्घकालीन समस्या सोडवत आहोत व सर्वांसाठी समान पाणी पुरवठा सुनिश्चित करत आहोत.

Trending

Exit mobile version