गोवा खबर : वाहतूक संचालनालयाने डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या अपघातांची आणि जारी केलेल्या चलनांचा मासिक अहवाल तयार केला आहे. अहवालानुसार, २४३ रस्ते अपघात झाले, त्यापैकी २३ प्राणघातक अपघात (उत्तर गोवा – १३ आणि दक्षिण गोवा – १०), २६ गंभीर अपघात (उत्तर गोवा – १० आणि दक्षिण गोवा – १६), ३५ किरकोळ अपघात (उत्तर गोवा – १० आणि दक्षिण गोवा – २५) आणि १५९ दुखापत न झालेले अपघात (उत्तर गोवा – ९० आणि दक्षिण गोवा – ६९) होते.
रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या २४ (उत्तर गोवा – १४ आणि दक्षिण गोवा – १०), ३९ लोक गंभीर जखमी (उत्तर गोवा – १५ आणि दक्षिण गोवा – २३), तर ५८ जणांना किरकोळ दुखापत झाली (उत्तर गोवा – १६ आणि दक्षिण गोवा – ४२).
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १६ चालक (उत्तर गोवा – ९ आणि दक्षिण गोवा – ७), ५ मागे बसलेले (उत्तर गोवा – ३ आणि दक्षिण गोवा – २), १ चालक (उत्तर गोवा) आणि २ पादचारी (उत्तर गोवा – १ आणि दक्षिण गोवा – १) यांचा समावेश आहे.