गोवा खबर : सेसा फुटबॉल अकादमीने ड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२५ च्या राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. शुक्रवारी फिल्ड्सऑफड्रीम्स येथे झालेल्या गोवा प्रादेशिक फेरीच्या अंतिम सामन्यात डेम्पो एससी विरुद्ध झालेल्या कठीण लढतीनंतर सेसा अकादमीने हा पराक्रम केला. हा सामना २-२ अशा बरोबरीत संपला, मात्र अखेर पेनल्टी शूट-आउटमध्ये सेसा अकादमीचा गोलरक्षक साकिब लमतुरे हिरो ठरला. त्याने अप्रतिम बचाव करत आपल्या संघाला अंडर–१७फुटबॉलटूर्नामेंटमध्ये ४-२ ने विजय मिळवून दिला.