गोवा खबर

नीरज चोप्रा करत असलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांकडून प्रशंसा

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लठ्ठपणाविरोधात लढा देण्यासाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. लठ्ठपणाविरुद्ध लढण्याच्या आणि निरोगी जीवनशैली राखण्याच्या गरजेवर मोदी यांनी भर दिला.

फिट इंडियासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व यावरील ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांच्या लेखाला प्रतिसाद देताना, मोदी एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले;
“@Neeraj_chopra1 चा एक अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी लेख , ज्यात लठ्ठपणाविरोधात लढा आणि निरोगी राहण्याच्या गरजेचा पुनरुच्चार केला आहे. ”

Trending

Exit mobile version