गोवा खबर

आपला परिसर स्वच्छ व हरीत ठेवा : मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर :  परिसर हरीत आणि स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामीण भागात कचऱ्याची नियोजनबद्ध पद्धतीने विल्हेवाट लावून निरोगी वातावरण राखण्याच्या प्रयत्नांमध्ये जनतेने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

मये मतदारसंघातील पाच प्रमुख प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. सावंत यांनी पंचायत सदस्यांना राज्यातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी सक्रीय होण्याची गरज व्यक्त केली. पंचायतीनी  स्थानिक लोकांच्या सहकार्याने आपल्या भागातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी अधिक सक्रिय होण्याचे आवाहन केले.

कृषी धोरणावर भर देऊन सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करीत असून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना शेती पुनरुज्जीवित करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकार अनेक अनुदान योजनांची अंमलबजावणी करतो आणि सेंद्रिय कृषी लागवडीस प्रोत्साहन देतो असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पाच प्रमुख कामांमध्ये मये आणि वन-मावळिंगे-कुडचिरे भागात भूमिगत केबल घालण्याच्या कामाची सुरवातकेली. तसेच डिचोली तालुक्यातील मये येथील तळ्याची सुधारणा, डिचोली तालुक्यातील वायंगिणे-मये येथील मानशीच्या गेटची व खाजन बंधाऱ्याची दुरूस्ती आणि डिचोली तालुक्यातील श्री विठ्ठल मंदिराचे सुशोभीकरणाचे काम यांचा समावेश आहे.

 स्थानिकांना संबोधित करताना मयेचे आमदार आणि फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष  प्रेमेंद्र शेट यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार अनेक योजनांची अंमलबाजावणी करतो असे सांगून शेतकऱ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष  शंकर चोडणकर, जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, मये मतदारसंघातील विविध पंचायतींचे सरपंच आणि पंचायत सदस्य उपस्थित होते.

Trending

Exit mobile version