गोवा खबर

कायदा जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : उत्तर गोवा जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाने  व्हीएम साळगावकर कायदा महाविध्यालयाच्या कायदा सहाय्य संस्थेच्या सहकार्याने, मळा येथील मोफत कायदा मदत कक्षाने नालसा /जीएसएलएसए अंतर्गत शहरात कायदा जागरूकता कार्यक्रम आयोजित केला होता. यामुळे लोकांना कायदेशीर प्रणाली प्रक्रिया कशा वापरायच्या हे समजण्यास मदत होते.

उद्घाटन सत्राला प्रधान जिल्हा न्यायाधीश इर्शाद आगा उपस्थित होते. वकिल श्री मेंडेस यांनी मेडिटेशन विषयावर भाषण केले आणि त्याचे फायदे सांगितले.

यावेळी डीएलएसएच्या सचिव शांताश्री कुडचडकर, आरती कुमारी, वकील संघटणेचे अध्यक्ष संतोष भरणे उपस्थित होते.

कायदा जागरूकता कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे लोकांना त्यांच्या कायदा हक्कासंबंधी आणि जबाबदाऱ्यांबद्दल शिक्षित करणे असा आहे. या कायदा जागरूकता कार्यक्रमाला शहरातील अनेक लोक उपस्थित होते.

Trending

Exit mobile version