गोवा खबर : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांच्या कुटुंबासह प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने पवित्र स्नान केले.
मुकेश अंबानी यांच्या सोबत त्यांची आई कोकिलाबेन, पुत्र आकाश आणि अनंत, सुना श्लोका आणि राधिका, नातवंडे पृथ्वी आणि वेदा तसेच बहिणी दीप्ती सालगावकर आणि नीना कोठारी यांनी स्नान केले. त्यांच्यासोबत अंबानी यांच्या सासू पूनमबेन दलाल आणि साली ममता दलालही उपस्थित होत्या.
चार पिढ्यांचा अंबानी कुटुंबाने गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या पवित्र संगमावर कोट्यवधी भाविकांसोबत या आध्यात्मिक यात्रेत सहभागी होत धार्मिक स्नान केले. निरंजनी आखाड्याचे स्वामी कैलासनंद गिरी महाराज यांच्या हस्ते गंगा पूजेचे आयोजन करण्यात आले. यानंतर अंबानी यांनी परमार्थ निकेतन आश्रमाचे स्वामी चिदानंद सरस्वती महाराज यांची भेट घेतली. या आश्रमात अंबानी कुटुंबाने प्रसाद व जीवन jackets वितरित केल्या.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने कुंभ मेळ्याला आलेल्या भाविकांसाठी ‘तीर्थयात्री सेवा’ या उपक्रमाच्या अंतर्गत विविध सेवा दिल्या आहेत. यात भाविकांना अन्नसेवा, आरोग्यसेवा, सुरक्षित वाहतूक, तसेच उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीसाठी सुविधा पुरवल्या जात आहेत.
‘We Care’ या तत्त्वज्ञानाला अनुसरून रिलायन्सने भाविकांसाठी पवित्र जलात सुरक्षा, विश्रांती क्षेत्रे, स्पष्ट मार्गदर्शन आणि प्रशासन व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सहाय्य अशा विविध उपक्रमांची आखणी केली आहे.