गोवा खबर : संरक्षण राज्य मंत्री संजय सेठ यांनी 15 व्या एरो इंडियाच्या पार्श्वभूमीवर 10 फेब्रुवारी 2025 रोजी बेंगळुरू येथे विविध द्विपक्षीय बैठका घेतल्या.
इटलीचे संरक्षण अवर सचिव मॅटेओ पेरेगो डी क्रेमनागो यांच्यासोबतच्या झालेल्या त्यांच्या बैठकीत, दोन्ही मंत्र्यांनी भारताच्या स्वदेशी प्रणालींच्या संरक्षण क्षमता विकास आणि मनुष्यबळ विकास क्षमतांच्या विकासासह द्विपक्षीय चर्चेच्या विविध पैलूंचा आढावा घेतला.त्यांनी सर्व क्षेत्रातील संबंध दृढ करण्याच्या त्यांच्या असलेल्या वचनबद्धतेला दुजोरा दिला.
यूकेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे मंत्री,लॉर्ड व्हर्नन कोकर यांच्याशी झालेल्या बैठकीदरम्यान, दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याचा आढावा घेतला आणि आपले संबंध मजबूत करण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शविली.