गोवा खबर

तंबाखूजन्य उत्पादने आणि ई-सिगारेटच्या विक्रीबाबत राज्याला नवीन सूचना

Published

on

Spread the love

गोवा खबर : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० अंतर्गत मान्यता असलेली उत्पादने सोडून त्यांच्या अधिकारक्षेत्रात ई-सिगारेट, हीट-नॉट-बर्न उपकरणे, व्हेप, ई-शीशा, ई-निकोटीन फ्लेवर्ड हुक्का आणि निकोटीन वितरण सक्षम करणारी तत्सम उपकरणे यासह कोणतीही इलेक्ट्रॉनिक निकोटीन वितरण प्रणालीची ऑनलाईन विक्रीसह उत्पादने, वितरण, व्यापार, आयात, विक्री आणि जाहिरात होणार नाही याची खात्री करण्याचा करण्याचा आदेश दिला आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यापूर्वी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोटपा २००३ आणि पीईसीए, २०१९ ची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत. भारत सरकारने सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातींवर बंदी आणि व्यापार आणि वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरणाचे नियमन) कायदा (कोटपा), २०२३ लागू केला आहे ज्यामध्ये जनतेचे, विशेषतः मुले आणि तरुणांचे तंबाखूच्या व्यसनापासून संरक्षण करण्यावर आणि भारतीय संविधानाच्या कलम ४७ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्वसाधारणपणे सार्वजनिक आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने भर देण्यात आला आहे.

भारत सरकारने सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी आणि निकोटीनच्या हानीपासून लोकांना वाचविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सिगारेटचे उत्पादन (उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात) कायदा, २०१९ लागू केला आहे. पीईसीए, २०१९ च्या कलम ४ मध्ये इतर गोष्टींबरोबरच इलेक्ट्रॉनिक सिगारेटचे उत्पादन, उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात करण्यास मनाई आहे.

मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी तंबाखू उत्पादने आणि ई-सिगारेटच्या ऑनलाइन विक्रेत्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे.

Trending

Exit mobile version