गोवा खबर : गोव्यातील पारंपारिक लोकनाट्य “द खेल” चे जतन आणि संवर्धन करण्यासाठी गोवा तियात्र अकादमीने संपूर्ण गोव्यात झोमनिवेले खेळ सादर करण्यासाठी दिग्दर्शकांकडून अर्ज मागविले आहेत. झोमनिवेले खेळ हा गोव्याच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे आणि तीन दिवसांच्या कार्निव्हल उत्सवादरम्यान हे खेळ सादर केले जातात. या कार्निव्हल उत्सवात गोव्यातील गावे आणि शहरांमध्ये जमिनीवर खेळ सादर केले जातात.
गोव्यातील ४० मतदारसंघांपैकी प्रत्येकी किमान एका दिग्दर्शकाला घेऊन सर्व दिग्दर्शकांना पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. या कार्निव्हल उत्सवापूर्वी खेळांचे सादरीकरण केले जाईल. झोमनिव्हेले खेळाचे सविस्तर नियम आणि कायदे अर्जासह गोवा तियात्र अकादमीच्या https://tiatracademyofgoa.com या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
ज्या दिग्दर्शकांना त्यांचे खेळ सादर करायचे आहेत त्यानी विहित नमुन्यातील अर्ज तियात्र अकादमीकडे सादर करावे. पूर्ण भरलेले अर्ज अकादमीच्या कार्यालयात १० फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत पोहोचले पाहिजेत. अपूर्ण व उशिरा आलेला अर्जांचा विचार केला जाणार नाही.