गोवा खबर

डिसेंबर 2026 पर्यंत नवीन कर्करोग रुग्णालय

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यातील नवीन कर्करोग रुग्णालय डिसेंबर 2026 पूर्वी कार्यान्वित होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.

या इस्पितळात कर्करोगाच्या रुग्णांना चांगल्या सुविधा मिळतील, असे त्यांनी सांगितले. नवीन कर्करोग इस्पितळ लवकर व्हावे यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू आहेत, असे ते म्हणाले.

कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक टीम कार्यरत आहे. डिसेंबर 2026 पर्यंत ते पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारने संपूर्ण भारतात नवीन एम्स रुग्णालये स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे. तेव्हा गोव्यालाही एक इस्पितळ मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यमान रुग्णालयांचे अपग्रेडिंग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, फोंडा उपजिल्हा रुग्णालय आणि वास्को कॉटेज इस्पितळाचा समावेश आहे, असे सांगून गोमेकॉत जागा वाढवणार, असे ते म्हणाले.

राणे यांनी गोमेकॉमध्ये आणखी 100 वैद्यकीय जागांची संख्या वाढवण्याची योजना जाहीर केली. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) सुचवल्याप्रमाणे रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार केला जाईल, असे ते म्हणाले.

 

Trending

Exit mobile version