गोवा खबर : आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणेश जयंतीनिमित्त शनिवार, दिनांक १ फेब्रुवारी रोजी रात्रौ ९.३० वसंत जाधव लिखित आणि उमेश आगरवाडेकर दिग्दर्शित “देवता” सामाजिक नाटक सादर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी आगरवाडा गावातील दिवंगत आणि ज्येष्ठ नाटय कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी पत्रकार किशोर नाईक गावकर उपस्थित राहणार आहेत, तर खास निमंत्रित म्हणून मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक उपस्थित राहणार आहेत.
या सत्कारमूर्तीमध्ये संतोष चोडणकर, दामोदर दामाजी, जनार्दन नाईक, (मरणोत्तर) तर आनंद कोरगावकर, अनिल राऊत, राजेंद्र नाईक, दिगंबर मसुरकर, रामनाथ बगळी, रमाकांत राऊत, प्रभाकर नागवेकर, उमेश आगरवाडेकर (नाट्य लेखक) आदींचा समावेश आहे.
यां नाटकात भिंगा हाडकी, विठोबा बगळी, गौरेश बगळी, मंगेश फडते, उल्हास नागवेकर, अमोल राऊत, भालचंद्र मांद्रेकर, सुदन नाईक, आनंद नाईक, महेश परब, अरविंद परब आणि निवेदिता चंद्रोजी आदींनी भाग घेतला आहे.
सुनील आगरवाडेकर (संगीत), राजू गावकर (तलरक्षक), सोपटे नाटय भांडार (नेपथ्य, रंगभूषा), संजय मुरारी म्हामल (पार्श्वसंगीत), साई चोडणकर, हेमंत गोसावी, प्रकाश हाडकी, प्रशांत जाधव आदी बाजू पाहणार आहेत.