गोवा खबर

मांद्रे येथे 2 फेब्रुवारी रोजी पंडित राजाराम बुवा मांद्रेकर स्मृती संगीत समारोह

Published

on

Spread the love
गोवा खबर:गायनाचार्य राम कृष्ण बुवावजे सांस्कृतिक मंडळ म्हापसा पंडित राजाराम बुवा मांद्रेकर स्मृती संगीत समिती, म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मांद्रे व कला आणि सांस्कृतिक संचनालय गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने कलाकारांच्या स्मरणार्थ संगीत समारोह रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 ते रात्रौ 8 वाजेपर्यंत जिल्हा परिषद सभागृह मांद्रे  या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. 
हा संगीत समारोह गायनाचार्य रामकृष्ण बुवावजे पंडित राजाराम बुवा मांद्रेकर ह .भ. प .श्री दामोदर बुवा केळकर व पंडित जयराम जयवंत मांद्रेकर यांच्या स्मरणार्थ संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे सचिव गोरख मांद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मांद्रे जिल्हा परिषद सभागृहामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदे प्रशांत मांद्रेकर सोमनाथ पार्सेकर श्री. पूर्खे श्री. जठार श्री मांजरेकर आदी उपस्थित होते.

Trending

Exit mobile version