गोवा खबर

‘वंदे मातरम’चा १५० वा वर्धापन दिन साजरा

Published

on

Symbolic Image
Spread the love

गोवा खबर : सांखळी येथील सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्र गीत वंदे मातरमचा १५० वा वर्धापन दिन साजरा केला.

प्रा. (डॉ.) नामदेव गावस यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अभिमान वाढविण्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकत ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताचे महत्त्व सांगितले.

 महाविद्यालयातील शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह एकूण ४३० स्पर्धकांनी भारत मातेसाठी अत्यंत आदर आणि श्रद्धेने ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायले.  सानिका बर्वे, सनिक्षा चोडणकर, अदिती गर्दे आणि सर्वज्ञा चोडणकर या  महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी या गायनात भाग घेतला.

Trending

Exit mobile version