गोवा खबर : गोवा पर्यटन आशियातील अग्रगण्य असे प्रवास आणि पर्यटन प्रदर्शन, अत्यंत अपेक्षित अश्या ओटीएम मुंबई २०२५ मध्ये अभ्यागतांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज आहे. हा कार्यक्रम ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे.
अभ्यागत जे-टी ११०, जास्मिन हॉल, ३रा मजला येथे गोवा पर्यटनाच्या दालनात वारसा स्थळे, पारंपारिक सण, हरित-पर्यटन सेवा आणि बरेच काही अनुभव देऊन गोव्यातील कमी-पाहिलेली स्थळे सादर करतील. एकादशा तीर्थ, साहसी पर्यटन आणि अध्यात्मिक पर्यटन यासारख्या मुख्य व ठळक उपक्रमांचा यात समावेश असेल, ज्यामध्ये शाश्वतता आणि सांस्कृतिक जतनासाठी गोव्याचे समर्पण अधोरेखित केले जाईल.
पर्यटन संचालक केदार नाईक यांनी सांगितले, की ओटीएम मुंबई येथे, आम्ही गोव्याचे खरे सार सादर करण्यास उत्सुक आहोत. ओटीएम सारखे माध्यम आम्हाला गोव्यातील विविध सेवा सादर करण्याची संधी देतात, ज्याद्वारे अस्सल व समृद्ध अनुभव शोधणाऱ्या प्रवाशांसाठी गोवा राज्य हे जागतिक गंतव्यस्थान असल्याचे रेखांकित होते.
गोवा पर्यटनाचे दालन हे गोव्याचा सांस्कृतिक वारसा, विविध उत्सव, रोमांचकारी साहसी पर्यटनाचे पर्याय आणि निर्मळ अशी अंतर्गत स्थळे प्रदर्शित करतील. हे प्रदर्शन एक प्रमुख, नाविन्यपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून गोव्याचे स्थान मजबूत करण्यासाठी एक मौल्यवान नेटवर्किंगचे व्यासपीठ म्हणूनही काम करणार आहे. हे प्रदर्शन गोव्याला एमआयसीई (बैठक, इंसेंटीव्हीज, परिषदा आणि प्रदर्शने) पर्यटनासाठी एक प्रमुख गंतव्यस्थान म्हणून सादर करेल. तसेच गोव्याला विवाहसोहळ्यांसाठी एक आदर्श स्थान म्हणून प्रोत्साहन मिळेल.
ओटीएम मुंबई २०२५ येथे गोवा पर्यटनाच्या दालनाला भेट द्या आणि “गोवा बियॉन्ड बीचेस” ची जादू पुन्हा अनुभवा. गोव्याच्या शांत बॅकवॉटरपासून ते गोव्यातील गजबजलेल्या बाजारपेठा आणि पारंपारिक उत्सवांपर्यंत, गोव्याची अद्वितीय ओळख परिभाषित करणारी स्थळे, आवाज आणि कथांचा अनुभव घ्या. गोव्याला विश्रांती, व्यवसाय आणि भव्य कार्यक्रमांसाठी एक अपवादात्मक गंतव्यस्थान बनवणाऱ्या अनुरूप सेवांबद्दल जाणून घ्या. तुम्ही साहस शोधणारे प्रवासी असाल, नयनरम्य लग्नाचे नियोजन करणारे जोडपे किंवा एखादा संस्मरणीय कॉर्पोरेट कार्यक्रम आयोजित करणारे व्यावसायिक असाल, गोव्याकडे प्रत्येक प्रसंगासाठी काहीतरी खास, विशेष आहे. परंपरा आणि आधुनिकता एकत्र पहायला मिळणाऱ्या जगात म्हणजेच गोव्यात या आणि भारताच्या आवडत्या किनारपट्टीच्या नंदनवनात अविस्मरणीय आठवणी निर्माण करा.