8 मार्च ते 14 मार्च दरम्यान ‘आधार’ सप्ताह

0
396

 

 

 गोवा खबर:दिनांक 8 मार्च ते 14 मार्च दरम्यान महाराष्ट्र व गोवा राज्यात आधार’ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र-गोवा टपाल विभागाची 1293 आधार केंद्रे देखील सहभागी आहे.

या सप्ताहानिमित्ताने गोवा टपाल खात्याने सर्व नागरिकांना आधार कार्ड’  संबंधित सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. जवळच्या टपाल कार्यालयात आधार नोंदणी व 5 ते 15 वयोगटातील मुलामुलींच्या बोटांचे ठसे अद्ययावत करण्याची मोफत सेवा मिळू शकेल;  तसेच आधार सप्ताहानिमित्त आयोजित विशेष आधार शिबिरांमध्ये सशुल्क सेवांचा लाभ घेत येईल.