कला अकादमीत रंगणार 38वा सूरश्री केसरबाई केरकर संगीत समारोह

0
1405
Minister for Art & Culture, Shri Govind Gaude briefing the Print and Visual Media Persons during the Press-conference at Kala Academy, Campal on October 29, 2018.

गोवा खबर: कला अकादमीचा प्रतिष्ठेचा ‘38वा सूरश्री केसरबाई केरकर संगीत समारोह’  2, 3 व 4 नोव्हेंबर रोजी दिनानाथ मंगेशकर कलामंदिरमध्ये होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन  2 रोजी सायं. 5.45 वा. कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते होणार आहे.

सूरश्री केसरबाई केरकर संगीत समारोहाच्या उद्घाटना सोहळ्या वेळी  पुर्वारंभी ‘हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व त्याची सौदर्यस्थळे’ या विषयावर परिसंवाद हा कार्यक्रम सकाळी 10.30 वा. कला अकादमीच्या कृष्णकक्षात आयोजित करण्यात आला आहे. नामवंत संगीत समीक्षक मुकुंद संगोराम हे या परिसंवादाचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहे तसेच पं. दिनकर पणशीकर, डॉ. विद्याधर व्यास व डॉ. पं. अजय पोहनकर ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील तज्ञ मंडळी सहभागी होणार आहे.

2 रोजी उद्घाटन समारंभानंतर सायं. 6 वा. कोलकाता येथील गायक कलाकार उत्साद अर्षद अली खान यांची शास्त्रीय गायनाची मैफल होणार आहे तर सांगता पं. सतीश व्यास यांच्या संतूर वादनाने होणार आहे.  3 रोजी सकाळी 10 वा. गोमंतकीय कलाकार वीणा मोपकर यांचे शास्त्रीय गायन, दु. 11 वा. जयपूर अत्रैली घराण्याचे गायक डॉ. अरुण द्रविड यांचे शास्त्रीय गायन, व सांगता पं. विश्वनाथ कान्हेरे यांच्या संवादिनी एकलवादन कार्यक्रमाने होणार आहे.

शनिवारी दुसऱ्या सत्रात सायं. 4 वा. बेंगलुरु येथील भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन, मुंबई येथील धनश्री पंडित राय यांच्या ठुमरी गायनाची मैफल, कोलकाता येथील अर्नब चटर्जी यांचे शास्त्रीय गायन आणि सांगता कोलकता येथील कलाकार पं. कुशल दास यांच्या सतारवादनाच्या मैफलीने होणार आहे.

. 4 रोजी सकाळी 10 वा. इंदोर येथील शोभा चौधरी यांचे शास्त्रीय गायन, पुणे येथील अनुराधा कुबेर यांची शास्त्रीय मैफल आणि सकाळच्या सत्राची सांगता उत्साद मोईनुद्दीन खान यांच्या सारंगीवादनाच्या मैफलीने होणार आहे. सायं. 4 वा. गोमंतकीय कलाकार संदेश खेडेकर यांचे शास्त्रीय गायन, कोलकता येथील उत्साद वसीम अहमद खान यांच्या शास्त्रीय गायनाची मैफ्ढल, ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. केदार नारायण बोडस यांच्या शास्त्रीय गायनाची मैफ्ढल आणि सत्राची सांगता कोलकता येथील तबलावादक पं. कुमार बोस आणि चेन्नई येथील मृदंगम विद्वान थिरुवरूर भक्तवत्सलम यांच्या तबला-मृदंगम वाद्यजुगलबंदी मैफलीने होणार आहे.

या समारोहात तबलासाथ पं. ओमकार गुलवाडी, उत्साद मोहम्मद अक्रम खान, पं. कालिनाथ मीश्रा, पं. मुकुंदराज देव, पं. तुळशिदास बोरकर, उदय कुलकर्णी, मयांक बेडेकर आणि अमर मोपकर करणार आहेत. हार्मोनियम साथ डॉ. सुधान्शु कुलकर्णी, राया कोरगांवकर, चिन्मय कोल्हटकर, सुभाष फ्ढाताफ्xढकर, सिद्धेश डिचोलकर, दत्तराज सुर्लेकर, प्रसाद गांवस तर सारंखी साथ सारवार हुस्सने, व्हॉयलीन साथ विद्वान कुमार आणि पखवाज साथ विलास पळकर करणार आहेत.