गोवा खबर:नौदलाचे मिग 29 के फाइटर जेट विमान आज सकाळी सरावा दरम्यान दक्षिण गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीत कोसळून अपघात झाला.विमानाच्या इंजिनाला आग लागल्याचे लक्षात येताच विमानातील दोन्ही पायलट पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर पडले असून ते सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.








दाबोळी येथील आयएनएस हंसा येथून नियमित सरावासाठी उड्डाण घेतलेल्या मिग २९के विमानाच्या इंजिनाला आग लागल्याने विमान कोसळल्याची दुर्घटना घडली.विमान कोसळणार असल्याची कल्पना येताच पायलट कॅ. एम. शिवखंड व लेप्ट. कमांडर दीपक यादव यांनी पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून उडी घेतली.दोन्ही पायलट सुखरुपपणे जमीनीवर उतरले असून ते किरोकोळ जखमी झाले आहेत.
संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने दिलेली माहिती नुसार दोन्ही पायलट सुखरूप आहेत.
वेर्णा येथे औद्योगिक वसाहत आहे.तेथे अनेक कंपन्या आणि कारखाने आहेत.मात्र विमान निर्मनुष्य ठिकाणी कोसळल्याने जीवीत हानी टळली.
During a training mission, after take off from INS HANSA at Dabolim a Mig 29k trainer aircraft suffered an engine fire. The pilots Capt M Sheokhand and Lt Cdr Deepak Yadav ejected safely. @SpokespersonMoD
— SpokespersonNavy (@indiannavy) November 16, 2019
विमान कोसळल्याचे दिसताच लोकांनी ते पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.प्रशासनाने लागलीच अग्निशामक दलाचे बंब आणि रुग्ण वाहिका घटना स्थळावर पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली. पॅराशूट मधून उतरलेल्या दोन्ही पायलटला स्थानिकांनी मदत करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.
