70 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅव्हेलियन

0
509

 

 

गोवा खबर:70 वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 20 फेब्रुवारी ते 1 मार्च या काळात जर्मनीतल्या बर्लिन येथे आयोजित करण्यात आला आहे. परदेशी बाजारपेठेत भारतीय चित्रपट लोकप्रिय व्हावेत तसेच नव्या व्यवसाय संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी या महोत्सवात इंडियन पॅव्हेलियनद्वारे मंच प्रदान करण्यात आला आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर या इंडियन पॅव्हेलियनचे उद्‌घाटन करतील. बर्लिन महोत्सवासाठी यावर्षी तीन भारतीय फिचर फिल्म आणि एका लघु माहितीपटाची निवड करण्यात आली आहे. पुष्पेंद्र सिंग यांचा ‘लिपला और सत्त गीत’, प्रतीक वत्स यांचा ‘इब अले ओऊ’, अक्षय इंडीकर यांचा ‘स्थलपुराण’ तसेच एकता मित्तल यांचा ‘गुमनाम दिन’ या माहितीपटाचा यात समावेश आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारतीय उद्योग महासंघासमवेत या चित्रपट महोत्सवात सहभागी होत आहेत. भारतीय प्रतिनिधी मंडळ इज्रायल, दक्षिण आफ्रिका, न्युझीलंड, स्पेन, ब्राझील, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, अमेरिका या देशातल्या अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेणार आहे.