0
986

गोवा खबर:पणजी महानगर पालीकेच्या महापौरपदी उदय मडकईकर यांची  बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे पास्कोला मास्कारेन्हास यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली.  त्यांच्या निवड कार्यक्रमाला भाजप गटाच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला.

 

भाजप गटाकडे संख्याबळ नसल्याने भाजप गटाने या निवडणूकीतून माघार घेतली होती. त्यामुळे मडकईकरांची बिनविरोध निवड करण्यात आली. मडकईकरांच्या निवड कार्यक्रमाला भाजप नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याने त्यांची नाराजी काल दिसून आली.

पणजी महापौरपदी निवड झाली हा माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण आहे. पणजी स्वच्छ ठेवण्यावर माझा भर असणार आहे. स्वच्छतेला जास्त प्राधान्य दिले जाणार आहे. सध्या पणजी शहराला 356 वे नामांकन मिळाले आहे ही खूपच विचार करण्याची गोष्ट असून यामुळे आता पणजी स्वच्छ ठेवून एक आदर्श शहर करण्यासाठी माझे योगदान असणार आहे , असे यावेळी महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.

यावेळी मनपाचे नवनिर्वाचित आयुकत शशांक त्रिपाठी बाबुश मोन्सरात गटाचे सर्व नगरसेवक मनपाचे कामगार व सर्व अधिकारी उपस्थित होते.