51 व्या इफ्फीमध्ये ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विश्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर पुरस्काराची घोषणा

0
110

गोवा खबर : गोवा इथल्या 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, हिंदी आणि  बंगाली चित्रपटांचे गायक विश्वजीत चटर्जी यांना  इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर पुरस्काराने गौरवण्यात येईल असे माहिती प्रसारण मंत्री श्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

मार्च 2021 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

बीस साल बाद चित्रपटातल्या  कुमार विजय सिंग,कोहरा मधल्या राजा अमित कुमार सिंग,एप्रिल फुल मधल्या अशोक,  मेरे सनम मधल्या रमेशकुमार, नाईट इन लंडन मधला जीवन, दो कलिया मधल्या शेखर आणि किस्मतमध्ये त्यांनी साकारलेल्या  विकीच्या  भूमिकेला  रसिकांची मोठी पसंती मिळाली. आशा पारेख, वहिदा रेहमान, मुमताज,माला सिन्हा आणि राजश्री या प्रख्यात अभिनेत्रीसमवेत त्यांनी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांच्या बंगाली चित्रपटांमध्ये चौरीन्घी (1968), उत्तम कुमार यांच्यासमवेत गढ नसीमपूर, कुहेली आणि त्यानंतर श्रीमान पृथ्वीराज (1973),जय बाबा तारकनाथ (1977)  आणि अमर गीती  (1983) यांचा समावेश आहे. 1975 मध्ये विश्वजीत यांनी ‘कहते है मुझको राजा’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिगदर्शन त्यांनी केले. अभिनय आणि दिग्दर्शनाबरोबरच गायक आणि निर्माता म्हणूनही  त्यांनी  काम केले आहे.

SHARE
Previous articleIFFI Day 4
Next articleIFFI Day 4