50 व्या इफ्फी महोत्सवाची सांगता ‘मार्घे ॲन्ड हर मदर’ या चित्रपटाने होणार

0
380

 

 

 गोवा खबर:50 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता ‘मार्घे ॲन्ड हर मदर’ या चित्रपटाने होणार आहे. इराणी दिग्दर्शक मोहसेन मखमलबफ यांनी प्रथमच हा इटालियन चित्रपट दिग्दर्शित केला आहे. 

मार्घे या सहा वर्षाच्या मुलीभोवती या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. मार्घे तिच्या आईसोबत रहात असते. मात्र आर्थिक विवंचनेमुळे त्यांना घरातून बाहेर काढले जाते.

मार्घेची आई क्लॉडिया मार्घेला शेजारच्या वृद्ध बाईकडे सोपवते. हा इटालियन भाषेतील चित्रपट इटलीमध्ये चित्रित करण्यात आला असून इराणच्या नियमीत पार्श्वभूमीपासून कितीतरी लांब आहे.

या चित्रपटाला समीक्षकांची पसंती मिळाली आहे.  बॉस्फरस चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट दाखवण्यात आला होता.