50 व्या इफ्फी दृकश्राव्य गीताचे प्रकाशन

0
664


सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रेडिओ जिंगलही प्रकाशित

 

गोवा खबर:गोव्यात येत्या 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या 50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इफ्फी 2019 च्या दृक श्राव्य गीताचे, माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी आज नवी दिल्लीत प्रकाशन केले.

 

या गीतात मनोरंजनाचा मूळ स्रोत ठळकपणे कसा मांडण्यात आला आहे हे सविचांनी पत्रकार परिषदेत विषद केले. 2200 वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेल्या नाट्यशास्त्रात मनोरंजनाचे महत्व दडलेले आहे ते दर्शवणे हा यामागचा उद्देश असल्याचे खरे यांनी सांगितले.

इफ्फीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रेडिओ जिंगलचेही प्रकाशन करण्यात आले.