49 व्या इफ्फी चित्रपट महोत्सवाचा उद्या होणार दिमाखदार सोहळ्यात शुभारंभ

0
1217
Goa prepares to welcome the 49th International Film Festival of India (IFFI-2018), in Panaji, Goa on November 19, 2018.

गोवा खबर:49  व्या आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव अर्थात  इफ्फीचा उद्या संध्याकाळी  एका दिमाखदार सोहळ्यात शुभारंभ होणार आहे. यंदाच्या या चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटन समारंभात नव भारताचे दर्शन घडवणारी संकल्पना  चित्रपटांच्या  विविध छटांच्या मार्फत साकारली जाणार आहे. या 90 मिनिटांच्या कार्यक्रमात भारतीय चित्रपटसंस्कृती आणि परंपरेचे विविधरंगी आणि समृद्ध चित्रमय दर्शन रसिकांना बघायला मिळेल.या उद्‌घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, हिंदी, मराठी आणि हॉलीवूडचे अनेक कलावंत या सोहळ्याची शोभा वाढवतील. अक्षय कुमार, करण जोहर, ज्युलिअन लँदियास,ऋषिता भट, मधुर भांडारकर, सुभाष घई, अरिजित सिंग, रमेश सिप्पी आणि चीन हान यांच्यासारखे नामवंत कलाकार उपस्थित राहणार आहेत.

इतिहास, अॅक्शन आणि रोमान्स या चित्रपटातील महत्वाच्या संकल्पनांचे दर्शन उद्‌घाटन सोहळ्यात रसिकांना घडेल. हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलावंत सोनू सूद ऍक्शन तर शिल्पा राव रोमँटिक छटा रंगवेल. काही नृत्यकलावंत यावेळी नृत्यातून चित्रपट रसिकांना आनंद देतील.

गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड, गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर आणि चित्रपट प्रमाणपत्र लवादाचे अध्यक्ष प्रसून जोशी या उद्‌घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, हिंदी, मराठी आणि हॉलीवूडचे अनेक कलावंत या सोहळ्याची शोभा वाढवतील. अक्षय कुमार, करण जोहर, ज्युलिअन लँदियास,ऋषिता भट, मधुर भांडारकर, सुभाष घई, अरिजित सिंग, रमेश सिप्पी आणि चीन हान यांच्यासारखे नामवंत कलाकार उपस्थित राहणार आहेत.

Goa prepares to welcome the 49th International Film Festival of India (IFFI-2018), in Panaji, Goa on November 19, 2018.
Goa prepares to welcome the 49th International Film Festival of India (IFFI-2018), in Panaji, Goa on November 19, 2018.

पणजीतल्या शामा प्रसाद मुखर्जी सभागृहात संध्याकाळी साडे चार वाजल्यापासून हा सोहळा सुरु होईल. दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरुन तसेच पीआयबीच्या अधिकृत यूट्युब चॅनलवरुन या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. याचवेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट सुविधा कार्यालयाचेही उद्‌घाटन होईल.

यावेळी महोत्सवाचा शुभारंभाचा चित्रपट ‘द अस्पर्न पेपर्स’ चित्रपटमधली काही दृश्‍य या समारंभात प्रेक्षकांना दाखवली जातील. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक ज्युलियन लॅन्डिस प्रेक्षकांशी संवाद साधतील.

 

आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेचे ज्यूरी आणि पोलीश दिग्दर्शक रॉबर्ट ग्लिन्सकी हे ही यावेळी आपले विचार मांडतील. इतर ज्यूरी सदस्यही यावेळी उपस्थित असतील.

देशभरातील विविध भागांतील निर्मात्यांनी पाठविलेल्या शेकडो प्रवेशिकांमधून 26  फिचर (कथाधारित) आणि 21 नॉन-फीचर (कथाबाह्य) भारतीय चित्रपटांची निवड भारतीय पॅनोरामा ज्यूरीतर्फे करण्यात आली आहे. फीचर फिल्म ज्यूरींनी शाजी एन. करुण यांचा दिग्दर्शित चित्रपट ‘ओलू’  भारतीय पॅनोरामा 2018 विभागाच्या शुभारंभाचा चित्रपट म्हणून निवडला आहे तर कथाबाह्य चित्रपट म्हणून आदित्य सुहास जांभळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘खर्वस’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या महोत्सवात एकूण 68 देशांमधील 212 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यात आंतराष्ट्रीय स्पर्धा गटात 15 चित्रपट असून त्यात तीन भारतीय चित्रपट आहेत. 22 देशातून आलेले चित्रपट स्पर्धा गटात असतील.

इफ्फीच्या 49 व्या  आवृत्तीमध्ये इस्रायल हा विशेष देश म्हणून असणार आहे. मुंबईतील इस्रायलच्या वाणिज्य दुतावासाच्या सहकार्याने दहा चित्रपटांना  कंट्री फोकस पॅकेजसाठी निवडले गेले आहेत. कंट्री फोकस विभागासाठी अवी नेशर यांचा ‘द अदर स्टोरी’ हा पहिला चित्रपट असेल.

या महोत्सवात विशेष राज्य म्हणून झारखंडची निवड करण्यात आली आहे. विशिष्ट राज्याच्या कला आणि संस्कृतीवर प्रकाश टाकण्याच्या अनुषंगाने हा विभाग भारतीय राज्यातल्या चित्रपटांवर भर देईल.  या महोत्सवाचा भाग म्हणून  24 नोव्हेंबर 2018 रोजी झारखंड दिवस साजरा केला जाईल. झारखंड पॅकेजमधील चित्रपटांमध्ये  ‘डेथ इन गंज’, ‘रांची डायरी’, ‘बेगम जान’ यांचा समावेश आहे.

ॲनिमेशन चित्रपट विभागात म्हणजेच स्केच ऑन स्क्रीन मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन फिचर फिल्म्स दाखवल्या जातील. या चित्रपटांचे चित्रीकरण भारतीय स्टुडिओच्या मदतीने करण्यात आले आहे.

या महोत्सवादरम्यान ओपन एअर स्क्रिनिंग्स म्हणजेच मोकळ्या पटांगणात चित्रपट दाखवले जातील. याअंतर्गत यंदा खेलो इंडिया ब्रँडिंगचा विस्तार म्हणून  स्पोर्टस बायोपिक प्रदर्शित केले जातील. ‘गोल्ड’, ‘मेरी कोम’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘1983’, ‘एमएसडीः ड अ‍नटोल्ड स्टोरी’ व ‘सूरमा’ हे चित्रपट या विभागात दाखवले जातील.

मास्टर क्लासेस आणि इन-कनव्हरसेशन विभागात प्रसून जोशी, डॅन वॉलमन, श्रीकर प्रसाद, अनिल कपूर, सुमित इसरानी. बोनी कपूर, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, डेव्हिड धवन, वरुण धवन, रोहित धवन, जयराज, कौशिक गांगुली, शाजी करुण, श्रीजीत मुखर्जी, श्रीधर आणि श्रीराम राघवन, अनुपमा चोप्रा, राजीव मसंद, भावना सोमय्या, जेसन हॅफोर्ड, मेघना गुलजार, लीना यादव, गौरी शिंदे हे चित्रपट निर्माते आणि कलावंत चित्रपट रसिकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

‘होमेजेस्’ विभागाअंतर्गत हिंदी चित्रपट क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली जाईल.  यावर्षी शशी कपूर, श्रीदेवी,  एम. करुणानिधी व कल्पना लाजमी यांचे चित्रपट दाखवून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय होमेजेस्‌  विभागात टेरेन्स मार्श,मिलोस फोरमॅन आणि ऍनी व्ही कोटेस यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

यंदाच्या महोत्सवात अंध मुलांसाठी विशेष स्क्रीनिंग व ऑडिओसह चित्रपट दाखवले जातील. या विभागात ‘शोले’ आणि ‘हिचकी’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. तसेच महोत्सवात ट्युनिशियन चित्रपटांसंदर्भातही एक विशेष सादरीकरण असेल.