44 व्या टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-2019 मध्ये इंडिया पॅवेलियनचे उद्‌घाटन

0
969


इफ्फी-2019 चे पोस्टर आणि माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

गोवा खबर:कॅनडातले भारताचे उच्चायुक्त विकास स्वरुप यांनी आज 44 व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-2019 अर्थात टी आय एफ एफ मध्ये इंडिया पॅवेलियनचे उद्‌घाटन केले. यामुळे परदेशात भारतीय सिनेमे दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल तसेच व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

 

या उद्‌घाटन समारंभात गोव्यात या वर्षी होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पोस्टर आणि माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी या महोत्सवात होणाऱ्या विविध कार्यक्रमांबाबत उत्सुकता दर्शवली तसेच गोव्यात होणाऱ्या या महोत्सवाला उपस्थित राहायला इच्छुक असल्याचे मत व्यक्त केले.

भारतीय चित्रपटांनी जागतिक स्तरावर चित्रपट निर्मितीत नवीन मापदंड निर्माण केले आहेत. प्रत्येक चित्रपट महोत्सवात भारताच्या संभाव्य शक्तीला पसंती दिली जाते असे विकास स्वरुप यावेळी म्हणाले.

 

इंडिया पॅवेलियनच्या या उद्‌घाटन समारंभात चित्रपट निर्मिती आणि चित्रपट महोत्सवाशी संबंधित सुमारे 60 मान्यवर उपस्थित होते. यावेळी इफ्फीतील सहभागासह विविध विषयांवर चर्चा झाली.

पार्श्वभूमी:-

कॅनडातल्या टोरंटो येथे 5 ते 15 सप्टेंबर 2019 दरम्यान होत असलेल्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि भारतीय उद्योग महासंघ संयुक्तपणे सहभागी झाले आहेत. भारतीय प्रतिनिधी मंडळात चित्रपट महोत्सव संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक चैतन्य प्रसाद आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव धनप्रीत कौर यांचा समावेश आहे. कॅनडामध्ये भारतीय समुदाय मोठ्या संख्येने असल्यामुळे भारतीय सिनेमाप्रती अनेकांमध्ये स्वारस्य आहे.