3 महीन्यांनंतर पार पडली मंत्रीमंडळाची बैठक

0
1214
गोवा खबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्याने उपचारासाठी बहुतेक वेळा गोव्याबाहेर असल्याने पावसाळी अधिवेशना नंतर एकदाही न झालेली मंत्रीमंडळ आज अखेर मुख्यमंत्र्यांच्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी पार पडली.
मुख्यमंत्री आपल्या वरील आजाराच्या उपचारासाठी गोव्यात आणि गोव्या बाहेर हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असल्याने मंत्रीमंडळाची बैठक होऊ शकली नव्हती.मुख्यमंत्री पर्रिकर यांनी पावसाळी अधिवेशनात शेवटची मंत्रीमंडळ बैठक घेतली होती.सप्टेंबर मध्ये तिसऱ्यांदा उपचार घेऊन अमेरिकेतून आल्या नंतर मुख्यमंत्री मंत्रालयात देखील जाऊ शकले नव्हते.सप्टेंबर मध्ये दोनापावल येथील खाजगी निवासस्थाना वरुन त्यांना कांदोळी येथील केंकरे यांच्या खाजगी हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले होते.तेथे 4 दिवस उपचार घेऊन गणेश चथुर्थीच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आजारपणा मुळे मुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे बोलून दाखवली होती.त्याच दिवशी त्यांनी कांदोळी येथील केंकरे हॉस्पिटल मध्ये घटक पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली होती.
पर्रिकर यांच्या बिघडत चाललेल्या तब्बेतीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेऊन विशेष विमान पाठवून 15 सेप्टेंबर रोजी दिल्ली येथील एम्स मध्ये दाखल करून घेतले होते.दरम्यानच्या काळात सरकार चालवताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी 3 निकरिक्षक पाठवून राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतला होता.मात्र पर्रिकर यांच्या शिवाय सरकार स्थिर राहु शकत नसल्याची कल्पना आल्या नंतर शहा यांनी पर्रिकर हेच मुख्यमंत्री राहतील असे जाहीर केले होते.
एम्स मध्ये उपचार घेत असताना देखील मुख्यमंत्री घटक पक्षाचे नेते आणि मंत्र्यांना भेटून राज्यातील प्रश्न निकालात काढण्याचा प्रयत्न करत होते.मात्र नियमित मंत्रीमंडळ बैठक होत नसल्याने अनेक विषय प्रलंबित राहिले होते.
तब्बल 3 महिन्या नंतर आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या खाजगी निवासस्थानी मंत्रीमंडळ बैठक घेऊन अजेंड्यावर असलेले विषय निकालात काढले.
मंत्रिमंडळ बैठकीत खाणग्रस्त ट्रक व बार्जमालकांसाठीच्या कर्जफेड सलवत योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी १० पैकी ९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली, तर गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (आयपीबी) हिरवा कंदील दाखवलेल्या कळंगुट येथील रॉनील रिसॉर्टचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने पुढे ढकलला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्या भाजपच्या गाभा समितीची भेट घेऊन चर्चा करणार आहे. यावेळी नेमके काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दोनापावला येथील मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानी बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. यावेळी ममता योजनेत दुरुस्ती,नागरीपुरवठा खात्याचा एक प्रस्ताव, वीजखात्यात आयटी विभाग व महसूल हमी साह्य गट तयार करण्यासाठी मे. आरईसीपीडीसीएल कंपनीला आणखी तीन वर्षांचे कंत्राट वाढवून देणे, डायोसेशन शिक्षण संस्थेने संपादित केलेल्या जमिनीसाठी नोंदणी शुल्कात ३ लाख ६१ हजार ४७८ रुपयांची सूट देणे आदी प्रस्ताव यादीत होते.
दरम्यान, खाणबंदीची झळ पोचलेल्या ट्रक व बार्ज मालकांना कर्जाची फेड करण्यासाठी सुरू केलेल्या सलवत योजनेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर केला. तर, कळंगुट येथे रॉनील रिसॉर्टच्या २८००० चौरस मीटर जमिनीत १३८ खोल्यांचे आयुर्वेदिक वेलनेस रिसॉर्ट उभारण्यासाठीचा प्रस्ताव तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने मंजुरी दिल्यानंतर या प्रकल्पासाठी नियोजित बागायत जमीन ‘गुंतवणूक प्रोत्साहन क्षेत्र’ म्हणून अधिसूचित करण्यासाठी सरकारकडे शिफारस आली होती. कायदा खात्याने त्याला मंजुरी दिली असून, मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक आहे.